top of page

“ आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा, तू कुठं होती वाघ बाई,माझ्या नादी लागू नको, सगळं बाहेर काढेन...”

मनोज जरांगे पाटलांचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात




मनोज जरांगे पाटील यांनी इशारा सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर बोलल्याचा आरोप केल्याने भाजपकडून जरांगे पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. चित्रा वाघ यांनी आरोप केला आहे की मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला आहे. यासह वाघ यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.


मनेाज जरांगे यांनी फडणवीसांना आईवरून शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. यावर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार पलटवार करत बोललो नाही पण ओघात शब्द निघाला असेल तर तो माघारी घेतो असे म्हणत “ आमच्या आया-बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तेव्हा हे लोक कुठे गेले होते? मी फडणवीसांना आईवरून काही बोललोच नाही. तरी देखील कोणी असा दावा करत असेल तर ते शब्द मी मोठ्या मनाने मागे घेतो.”


मनोज जरांगे पाटील म्हणाले “ चित्रा वाघ म्हणतायत की मी शिवी दिली. परंतु, मी काही कोणाला शिवी दिलेली नाही. तरी त्यांना असं वाटत असेल तर ज्या शब्दांवर त्यांचा आक्षेप आहे ते मी मागे घेतो. परंतु, आम्हाला आरक्षण द्या. कारण आमच्या आया-बहिणी देखील दिवसरात्र राब राब राबतायत, कष्ट करतायत. त्यांची लेकरं गळफास घेत आहेत. तुम्ही तुमच्या आईप्रमाणेच आमच्या आईकडे पाहा आणि तिच्या लेकराला आरक्षण द्या. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणाले, “ माझ्यावर आरोप करणार्‍या चित्रा वाघ यांनी सांगावं की आमची आई पोलिसांच्या लाठी हल्ल्यांनतर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा तुम्ही कुठे होता? आमच्या आईचं दु:ख तुम्हाला दिसलं नाही का? तेव्हा आमच्या आईला विसरलात का?”


“ त्या बाईला (चित्रा वाघ) रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आमची आई दिसली नाही का? ती बाई तेव्हा कुठे गेली होती? कधीपर्यंत सरकारच्या शेळ्या सांभाळणार? आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे मेली होतीस? आमच्या लहान मुली, तीन- चार वर्षाच्या मुली पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झाल्या, रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा तू झोपा काढत होतीस का? तेव्हा तुझी जात जागी झाली नाही का? तू कोणाच्याही नादी लाग, पण माझ्या नादी लागू नको. नाहीतर तुझे सगळे घोटाळे बाहेर काढेन.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले.


“ चित्रा वाघ फडणवीसांसाठी बोलतायत. कदाचित त्यांना आमदार किंवा खासदार व्हायचं असेल. मला त्यांना सांगायचं आहे की अनेक लोक आत्महत्या करत आहेत. त्यांच्या आईकडे देखील बघ. उगाच काहीही बोलून मुद्दा भरकटवू नका. मी कोणाच्याही आईला काही बोलत नाही. तुझी आई दोन लाखांची साडी नेसत असेल. आम्हाला फाटक्या लुगड्यातील आमची आई प्रिय आहे. माझा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करत. परंतु जेव्हा आमच्या आया-बहिणींना मारलं तेव्हा त्याचे व्हिडिओ का नाही शेअर केले?” असंही जरांगे पाटील आयोजी पत्रकार परिषदेत म्हणाले.

Comments


bottom of page