top of page

आमदार गायकवाडांच्या तक्रारीनंतर कॅन्टीनचा परवाना रद्द

ree


आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये सडलेले व दुर्गंधीयुक्त अन्न दिल्या प्रकरणी आमदार संजय गायवाड यांनी केलेल्या ठाम तक्रारीची तात्काळ दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित कॅन्टीनवर कारवाई करत परवाना थेट रद्द केला आहे.

आमदार निवासात दररोज भोजन करणार्‍या शेकडो लोकप्रतिनिधी, अधिकार्‍यांचा सन्मान, आरोग्य आणि सुरक्षिततचा विचार करून करण्यात आली आहे. काल 8 जूलै रोजी रात्री जेवणादरम्यान सडलेली डाळ व दुर्गंधीयुक्त भात दिला गेल्याचं लक्षात येताच आमदार संजय गायकवाड यांनी तो अन्नाचा नमुना स्वत: जवळ ठेवून आज सकाळी राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी प्रत्यक्ष निकृष्ट अन्न दाखवले व स्पष्ट शब्दांत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. संजय गायकवाड यांनी यापूर्वीही या कॅन्टीनबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु वेळेवर दुर्लक्ष झालं. अखेर या ठोस पुरव्यानंतर प्रशासनाला जाग येत आहे. कॅन्टीनचा परवाना रद्द करण्याची वेळ आली.


हे केवळ आमदार निवासापुरते मर्यादित नसून जनतेसाठी प्रशासनाला जबाबदार धरण्याचा एक स्पष्ट संदेश आहे. गुणवत्तेचा अभाव, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, आणि हलगर्जीपणाची कोणतीही जागा शासकीय व्यवस्थेत नसावी, यासाठी आमदार संजय गायकवाड यांचे भांडण ही उदाहरण बनला आहे. आजच्या या निर्णयामुळे अनेक लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले असून, अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य याप्रती शासन अधिक जागरुक होईल, अशा भावना व्यक्त होत आहेत.

Comments


bottom of page