top of page

आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने सभागृहात गोंधळछत्रपती शिवजी महाराजांविषयी विधान; विरोधकांच आक्षेप, आव्हाडांनी मागितली माफी

मुंबई: राज्य सरकारने आणलेल्या ‘ महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली, या विधेयकातील तरतुदींची मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. विधेकात सक्तीच्या धर्मांमतराविरोधात काय शिक्षा असेल, याबाबतही त्यांनी सभागृहाला सांगितले. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या विधेयकावर काही आक्षेप घेतले. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य नव्हे तर धर्माला नियंत्रित केले जात आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. याच वेळी भाषण करत असताना अव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या उल्लेखावर सत्ताधार्‍यवांनी आक्षेप घेतला. परिणामी सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्यवा निर्देशानुसार आव्हाड यांनी सभागृहाची माफीदेखील मागितली.


दरम्यान, आमदार जितेंद्र अव्हाड हे धर्मस्वातंत्र्य विधेयकावर बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मावर पाळत ठेवण्यात येत आहे. एखाद्याने धर्म बदलला तर त्याला थेट गुन्हेगार ठरवले जात आहे, अस आरोप आव्हाड यांनी केला. जेव्हा धर्माविरोधात बोलण्याची वेळ आली, तेव्हा लोक धर्माविरेाधात उभे ठाकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक का होऊ दिला नाही? तेव्हा कुठला धर्म आड आला होता? ते शुद्र होते म्हणून का? महात्मा फुले यांचा खून करण्याची सुपारी देण्यात आली. त्यांनी शण्णिाचे दरवाजे खुले केले म्हणून ही सुपारी देण्यात आली होती का? सावित्रीबाईंच्या चेहर्‍यावर, अंगावर शेण फेकरण्यात आलं, महिलांना शिक्षण दिलं म्हणून हे करण्यात आलं का ? असे यावेळी आव्हाड सभागृहात म्हणाले. आपल्या भाषणात पुढे बोलताना, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला. त्यावरच सत्ताधार्‍यांनी आक्षेप नोंदवला आणि निलंबनाची मागणी केली.


आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या उल्लेखांचा विरोध करण्यात आला. मंत्री शंभुराज देसाई यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत आव्हाड यांनी केलेले दावे आम्ही पहिल्यांदाच ऐकतो आहोत, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य करण्यात आले ते पटलावरून काढून टाकावे,अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. तसेच पुढे सत्ताधारी आमदारांनी आव्हाड यांनी माफी मागावी त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. विरोध वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आव्हाड यांनी माफी मागितली.

Comments


bottom of page