आम्ली पदार्थ विरोधीअभियानांतर्गत तलासरी पोलिसांची फेरी
- Navnath Yewale
- Aug 15, 2025
- 1 min read

तलासरी: पालघर जिल्ह्यात व पोलीस ठाणे हद्दीत 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 अंमली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली असून तलासरी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधिकारी व अंमलदार सोशल मिडिया माध्यमातून गावभेट दरम्यान नागरिकांमध्ये, कंपनीचे कामगार मध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहेत.निबंध स्पर्धा ही घेण्यात आल्या आहेत.
आज अंमली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत शिक्षण मंडळ कल्याण संचलित माध्यमिक विद्यालय तलासरी या शाळेची जनजागृती अनुषंगाने प्रभात फेरी काढण्यात आली होती.त्यामध्ये Say no to Drugs, नाशा नाही - दिशा हवी, अंमली पदार्थ थांबवा - जीवन वाचवा, अंमली पदार्थ सोडा - कुटुंबाचे हास्य जपा व इतर यांचे फ्लेक्स, बॅनर घेऊन अंमली पदार्थ दुष्परिणाम च्या अनुषंगाने घोषणा देऊन विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
तलासरी नाका - मार्गे तहसीलदार कार्यालय, तलासरी पर्यंत काढण्यात आली. सदर रॅली यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक दिपक पाटील व स्टाफ यांनी सहकार्य केले. सदर प्रभात फेरी मध्ये सु.750 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता. अंमली पदार्थ जनजागृती अभियान यशस्वी यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड व पोलिस अधिकारी आणि अंमलदार करीत आहेत.



Comments