‘यापुढे तुम्हाला’...शरद पवारांचा नातू पार्थ आणि जय पवारांना सल्ला! विद्या प्रतिष्ठाण विश्वस्तांच्या बैठकीस पहिल्यांदाच पार्थ आणि जय पवारांचा सहभाग, शरद पवारांनी साधला संवाद
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने पक्षासमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले असून, अजित पवारांच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी राजकीय असून आता ती भरुन काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुनेता पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, पार्थ किंवा जय पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्यासह दोन्ही मुलांच्या खांद्यावर अचानक मोठी राजकीय जबाबदारी आली असून हे धनुष्य पवार कुटुंबाला पेलावं लागणार आहे.
पुढील राजकीय वाटचालीत सुनेत्रा पवारांसह, जय आणि पार्थ पवार यांना शरद पवारांच्या मार्गदर्शनाची मोठी गरज भासणार आहे. शरद पवारही त्यासाठी मतभेद विसरुन मदत करताना दिसत आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठाणच्या बैठकीत असंच काहीसं चित्र दिसून आलं. बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत पार्थ आणि जय पवार पहिल्यांदाच सहभागी झाले होते. यावेळी शरद पवारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान बैठकीमध्ये आजोबा शरद पवारांनी नातू पार्थ आणि जय पवार यांना संस्थेच्या कामकाजाचे धडे दिल्याची माहिती आहे. संस्थेचं कामकाज नेमकं कसं चालत? अजित पवारांची भूमीका नेमकी कशी होती? विद्या प्रतिष्ठानमधील अजित पवारांचं काम तुम्हाला पुढे कसं नेता येईल? संस्थेच्या कामकाजासंबंधी पार्थ आणि जय यांना इतर विश्वस्तांकडून सविस्तर माहिती देण्यात आली. विद्या प्रतिष्ठाणच्या विश्वस्तांच्या बैठकीत पार्थ आणि जय पहिल्यांदाच सहभागी झाले होते. मात्र संस्थेत अजित पवारांची जागा कोण घेणार? याबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.
शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये आज शोकसभेचं अयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, नीता पाटील, विजया पाटील, श्रीनिवास पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार असे एकून पवार कुटुंबीय उपस्थित होते. पवार कुटुंबीयांनी सर्वांच्या भेटी घेतल्या, शरद पवारही तिथे पोहोचले होते. यावेळी तेदेखील खुर्चीवर बसून शोकसभेसाठी आलेल्या सर्वांची भेट घेताना दिसले. शोकसभेमध्येे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आमने-सामने आले होतेे.



Comments