top of page

आरक्षणाचा निर्णय आता मुंबईतच होईल - जरांगे पाटील

4 hours ago
1 min read

जालना: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवालीमध्ये मागील 13 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जरांगे पाटील यांनी एकून 15 मागण्यांसाठी आता थेट मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्यांच्या आंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 12 सप्टेंबर पर्यंत अल्टीमेट दिला आहे.


मराठा आरक्षण आंदोल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 12 सप्टेंबरचा अल्टीमेट दिला आहे. मागण्यांवर ठाम जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला असून मुंबई आंदोलनाची सुरू असल्याचं त्यांनी आज माध्यमांशी बोलतानां सांगितलं. सरकार मागण्यांवर सकारात्मक नसून मागील तीन वर्षापासून मागण्यांसाठी चालढकल करीत आहे. एकून मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात कृती काहीच नाही.


हैदराबाद गॅझेट प्रमाणे प्रमाणपत्र वाटप झालेले नाहीत. सातारा, कोल्हापुर गॅझेटची अद्याप अंमलबजावणी नाही असं म्हणत त्यांनी आरक्षणाचा निर्णय आता मुंबईतच होणार असल्याचा सज्जड इशारा दिला आहे. मंत्री शिरसाठ मुळेच एकनाथ शिंदे आणि आमच्यात वितुष्ट आल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे दिलं ते काढून घेतल्याची टीका यावेळी त्यांनी केली. मुंबई आंदोलनावर ठाम असून येत्या 12 सप्टेंबरला तारीख जाहीर करणार आहोत. मराठे महिलांसह मुंबईत धडकणार असल्याचं सांगत मुंबईतील मराठे अवश्यक तयारीला लागल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page