जरांगे पाटलांनी अमृता फडणवी यांचे निमंत्रण स्वीकारले पण...

आंतरवाली : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवालीत मागील 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मागण्यांवर ठाम जरांगे पाटील यांनी मुुंबईत खासकरून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या इशार्यानंतर अमृता फडणवीस यांनी “ जरांगे पाटील माझे भाऊ आहेत त्यांना जेवनाचं निमंत्रण देते” असं म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांना निमंत्रण दिलं. त्यावर “ भाऊ भाऊबीजीला साडी चोळी घेवून येईल” असं म्हणत जरांगे पाटील यांनीही त्यांचं निमंत्रण स्वीकरलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे आंतरवाली (जि. जालना) येथे दि.29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी 12 सप्टेंबर नंतर मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवावस्थानी वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिला.
मराठे आता वर्षा बंगल्यावरच आंदोलन करतील असा इशारा देत राज्यातील महिलांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हळदी-कुंकू घेवून ठिय्या देण्याचे अवाहन केले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना माध्यमांच्या जरांगे पाटील यांनी वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या ‘जरांगे माझे भाऊ आहेत, त्यांना मी जेवनाचं आमंत्रण देते’ असं भाऊक वक्तव्य केलं. अमृता फडणवीस याच्या भाऊक वक्तव्याला जरांगे पाटील यांनी त्याच शैलीत उत्तर दिलं. जरांगे पाटील म्हणाले की, भाऊ सध्या अडचणीत आहे, त्यामुळे भाऊ भाऊबीजीला साडी- चोळी घेवून येईल. युद्धाच्या मैदानात असलेल्या भावाला बहीणीच साथ हवी असते. त्यामुळे निश्चितच भाऊबीजीला हा भाऊ चाडी चोळी घेऊन येईल असं म्हणत जरांगे पाटील यांनी अमृता फडणवीस यांचे जेवनाचे निमंत्रण जरांगे पाटील यांनी स्वीकारले.



Comments