top of page

आसामच्या बिनिता छेत्रीने रचला इतिहास; जगभरात भारताचे नांव उंचावले




आसाममधील रहिवासी बिनिता छेत्री सध्या चर्चेत आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिने जगभरात भारताचे नाव उंचावले आहे.ब्रिटनच्या ग़ॉट टॅलेंट 2025 या शोची दुसरी उपविजेती ठरली आहे. या शोच्या अंतिम फेरीत पोहोचणारी बिनिता छेत्री ही पहिली भारतीय ठरली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा देखील यशाने खूप आनंदी आहेत अणि त्यांनी या 9 वर्षाच्या प्रतिभावान मुलीचा सन्मानही केला आहे.



बिनिता छेत्रीने ब्रिटेनच्या गॉट टॅलेंट 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचणारी ईशान्य भारतातील पहिली स्पर्धक बनवून इतिहास रचला आहे. टॅलेंट शो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिच्या अभूतपूर्व नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि तिला सर्वाधिक सार्वजनिक मते मिळाली, ज्यामुळे तिला ग्रँड फिनालेकमध्ये स्थान मिळाले.


दरम्यान, बिनिता छेत्रीने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मी सर्वांचे त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छिते. माझ्या कठोर परिश्रमाने आणि तुमच्या पाठिंब्याने मी या टप्यावर पोहोचू शकले आणि भारताचे प्रतिनिधित्व करू शकले. माझा अनुभव खूप चांगला होता. कारण सर्व परीक्षक माझ्यावर खूप खूश होते आणि त्याना सर्वांना मी आवडत होते.


“ शोच्या परिक्षकांच्या कमेंट्सनी मला आणखी प्रेरणा दिली. मी तीन वर्षाची असताना डान्स करायला सुरुवात केली. मी माझ्या मावशीकडून शिकायला सुरुवात केली होती. मी भारतात दोन रिअ‍ॅलिटी शोमध्येही भाग घेतला. मी पुढे नृत्य शिकण्यासाठी जयपूरला गेले होते. तिथे माझी हार्दीक रावत सरांशी भेट झाली. त्यानंतर, मी डान्स आयकॉन सीझन 2 मध्ये भाग घेतला ज्यामध्ये मी विजेता झाली. यानंतर माझा ब्रिटनच्या गॉट टॅलेंटमधील प्रवास सुरू झाला.”

Comments


bottom of page