top of page

ओमानच्या समुद्र किनार्‍यावरील जहाजावर भीषण मिसाइल हल्ला;24 पैकी 3 भारतीय क्रू मेंबर बेपत्ता

स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात बुधवारी ओमानच्या समुद्र किणार्‍यावर एका व्यापारी जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला होता. ज्या जहाजावर हल्ला झाला, त्या जहाजावर 24 भारतीय क्रू मेंबर होते. हल्यानंतर त्यातील 21 क्रू मेंबरला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही 3 क्रू मेंबर बेपत्ता आहे. भारत सरकार या हल्ल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.


ओमानच्या समुद्र किणार्‍यावर जहाजावर झालेल्या या हल्ल्याचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर भारत सरकारच्या वतिने अमेरिकन दुतावासाला एक विरोध पत्र देखील लिहिण्यात आलं आहे, भारताच्या वतीने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे, भारताने व्यापारी जहाजावर झालेल्या हल्यानंतर अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना आपली नाराजी कळवली आहे. बुधवारी ओमानच्या किनार्‍यावर ‘ सेटेबोलो’ नावाच्या जहाजावर भीषण हल्ला झाला होता.


दरम्यान, ज्या जहाजावर हल्ला झाला, ज्या जहाजावर 24 क्रू मेंबर होते. त्यातील 21 जणांना वाचवण्यात यश आलं असून तिघे बेपत्ता क्रू मेंबरचा शोध सुरू आहे. आंतराष्ट्रीय क्षेत्रामध्ये तणाव कमी झाला पाहिजे, तसेच व्यापारी जहाजांना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे, अशा जहाजांना विना अडथळा वाहतूक करता आली पाहिजे अशी मागणी देखील योवळी भारताने केली आहे.


या हल्ल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, सध्या भारताचा दुतावास तेथील परिस्थिवर लक्ष ठेवून आहे. अद्यापही जिथे हा हल्ला झाला तिथे ओमानच्या अधिकार्‍यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही तणाव कायम आहे. या तणावामुळे निर्माण झालेल्या संघर्षाचा हा परिणाम आहे. त्यामुळे आम्ही आता हा तणाव कमी करून चर्चे द्वारे हा प्रश्न सोडवला जावा अशी मागणी करतो, असं भाराच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मुज वाहतुकीसाठी बंद असल्याने त्याचा मोठा फटका हा अनेक देशांना बसत आहे.

Comments


bottom of page