अमेरिका, इराणमध्ये पुन्हा युद्धाला सुरुवात; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा जगभरात खळबळ
- Navnath Yewale
- Jul 10
- 1 min read

28 फेब्रूवारी रोजी अमेरीका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर इराण, अमेरीका आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. हे युुद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. युद्धाच्या दुसर्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. तर दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याने अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली, इराणच्या ड्रोन हल्यामध्ये इस्त्रायलचं प्रचंड नुकसान झालं तसेच अमेरिकेचे सैन्य तळ ज्या ज्या अखाती देशांमध्ये होते. त्या देशांवर देखील इराणकडून भीषण हल्ले करण्यात आले. दरम्यान त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला, त्यामुळे जगाने सुटकेचा निश्वास सोडला होता.
परंतु आता जगाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा आणि अमेरिकेमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यसांनी मोठी घोषणा केली आहे. इराण आणि अमेरिकेमधील युद्धविराम आता संपल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे अमेरिका इराणसोबत चर्चा सु, ठेवण्यास देखील तयार आहे, असंही ते म्हणाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आम्ही इराणसोबत चर्चा करण्यास तयार आहोत, परंतु आता इराणसोबतचा अमेरिकेचा युद्धविराम संपला आहे. दरम्यान, न्युयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, जर समजा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला आणि त्यानंतर त्यांनी इस्त्रायलची मदत मागितली तर पुन्हा एकदा इस्त्रायल या युद्धात उडी घेण्याचीर शक्यकता आहे.
दरम्यान, गुरुवारी अमेरिकेकडून इराणच्या अब्बास पोर्टवर भीषण हल्ला करण्यात आला होता.
दोन दिवसांमध्ये इराणचे 14 नागरिक मारले गेल्याचं वृत्त आहे, तर प्रत्यूत्तर म्हणून इराणने देखील अमेरिकेचे सहकारी देश असलेल्या कुवेत, बहरीन सारख्यशा देशांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे आता हे युद्ध चांगलंच पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Comments