top of page

ऑनलाईन जुगाराची लथ, जिवावर बेतली; अनेकांचे संसार उघड्यावर

ree


झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापाई तत्काळ पैसा मिळण्याच्या भ्रमात तरुण पिढी ऑनलाईन, मटका, रम्मी, चक्रीमटका अशा विविध गेमच्या आहारी जात आहे. सुरुवातील कमी पैशात गेम खेळणारा व्यक्ती मोबईलमध्ये व्यस्त होऊन हजारो, लाखो रुपये गमावून बसतो. पैसे गमावल्या नंतरही जिंकण्याच्या हव्यासापाई आर्थिक लुटीचा शिकार झालेला व्यक्ती नैराश्येत जिवावर येऊन ठेपत आहे. केवळ ऑनलाईन जुगारापाई कर्जफेडीच्या विवंचनेत जिवन संपवल्याचे प्रकार घडत आहेत.


तरुणाईमध्ये ऑनलाईन जुगाराचे क्रेज वाढत चालल्याने आनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. झटपट श्रीमंतीच्या नादात ऑनलाईन गेमच्या गर्तेत फसलेल्या तरुणाने नैराश्येतून कुटुंबासह जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बावी (जि. धाराशीव) येथे समोर आला आहे. बावी येथील ट्रॅक्टर चालक असलेल्या लक्ष्मण जाधव याने शेती विकून मोबाईल घेतला. शेती विकलेली शेती परत मिळविण्यासाठी त्याने जुगाराचा मार्ग अवलंबला, मोबाईलवर ऑनलाईन रम्मी खेळात त्याने जवळपास सात लाख रुपये त्यामध्ये घातले. हरलेले पैसे परत मिळविण्याच्या हव्यासापाई बायकोचे 2 तोळे सोनंही त्याने गमावलं. शेवटी त्याने उसणवारीचे लाख रुपयेही हारला. शेवटी नैराश्येतून त्याने पत्नी, दोन वर्षाच्या पोटच्या गोळ्याची रात्रीतून हत्या केल्या आणि स्वत:चे जिवन संपवून घेतले. ग्रामस्थांच्या मते लक्ष्मण याने पत्नी, मुलाची हत्या केल्यानंतर स्वत: ला संपवले.


कुर्डुवाडी (जि. सोलापूर) येथील बालाजी खरे या युवकास ‘चक्री मटका ’ या झटपट पैसे देणार्‍या ऑनलाईन गेममध्ये आडकला. व्यसनाधिन बालाजीने हव्यासापाई ‘ऑनलाईन चक्री’ मध्ये 90 लाख रुपयांहून अधिक पैसे त्यामध्ये घातले. बालाजी खरे यास मोबईमधील चक्री मटक्याची लत लागली होती. सुरवातील कमी पैशात जुगार खेळत असताना हव्यासापाई बालाजीने सहा एक्कर शेती विकली. शेतीचे विकून मिळालेला सर्व 70 लाख रुपये हारला. त्यानंतर पत्नीचे सोनं, खासगी उसणवार असे मिळून 20 लाखांपेक्षा अधिक पैसा त्याने चक्री मटक्यावर घातल्याने बालाजीवर रस्त्यावर फिरण्याची वेळ आहे. बीडमध्ये चक्क पीएसआय असलेल्या अमित सुतार यास ऑनलाईन रम्मीचे व्यसन जडलं. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसा मिळवण्याची त्याने नामी शक्कल लढवत पहिल्यांदा त्याने पोलिस अधिक्षक कार्यालयातील 58 बॅटर्‍या चोरल्या.


पोलिस अधिक्षक कार्यालयातच तो कर्तव्य बजावत होता. बॅटर्‍या चोरी प्रकरणी त्यास अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली होती.मात्र, नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या अमित सुतार याने पुन्हा ऑनलाईन रम्मी खेळण्यासाठी चक्क मोटारसायकल चोरीचा फंडा अवलंबला. जिल्ह्यात दुचाकी चोरींच्या घटना पोलिस यंत्रणेची डोके दुखी ठरल्याने पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यातच पीएसआय अमित सुतार गठला केवळ ऑनलाईन रम्मी खेळापाई अमित सुतार याने प्रतिमा मलिन करून तर घेतलीच पण लाखो रुपये हारवून बसला. शेवटी कारागृहात रवानगी ही बदनामी वेगळीच.


शिरुर कासार शहरातील नामांकित कापड व्यवसायीकाच्या मुलाने ऑनलाईन चक्री मटक्यात 9 लाख रुपये हारले. बांधकाम कामगाराच्या शेख शफिक या तरुणाने लाखो रुपये चक्री मटक्यात हारला या शिवाय असे कित्तेक तरुण बदनामी पुढे यायला धजावत नाहीत. नळेगाव (जि. लातूर) येथील महेश राम यादव या वय (30) या तरुणाने ऑनलाईन चक्री मटक्यात सातत्याने पैसे गमवावे लागल्याच्या नैराश्येतून शुक्रवारी (18 जूलै) गळफास घेवून आत्महत्या केली. महेशच्या पश्चात एक मुलगी, गरोदर पत्नी, भाऊ, आई-वडिल असा परिवार आहे. महेश नळेगाव येथे एका हॉटेलमध्ये कुकच काम करत होता. महेशला ऑनलाईन चक्री मटक्याचे व्यसन लागल्याने तो नेहमी घरून पैशाची मागणी करत असे. वारंवार पैसे देवून घरचे मेटाकुटीला आले. पैसे हरल्याच्या नैराश्येतून महेशने शुक्रवारी हॉटेलमध्येच गळफास घेवून जिवन संपवले.



मोबाईलमध्ये व्यस्त तरुणाईकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. सेलिब्रेटींकडून होणार्‍या ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. याही पलिकडे तरुणांनी पैसा कमवण्याच्या बेगडी, फसव्या अ‍ॅप पासून दूर राहवं, आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत करून भवितव्य घडवणं काळाची गरज आहे. ऑनलाईन गेमच्या आमिषाला बळी नपडता कर्तव्याची जानिव ठेवून तरुण पिढीने जाबाबदार्‍या पेलनं अवश्यक आहे. जुगाराच्या नादात सर्व काही गमावून पदरी नैराश्य आणि शेवट जिवावर बेतत असेल तर त्या पासून लांब राहिलेलं कधीही चांगलच स्वत: साठी आणि परिवारासाठीही

Comments


bottom of page