top of page

‘ऑपरेशन सिंदूर’ साठी लग्न उरकून जवान भारतमातेच्या रक्षणासाठी रवाना नव वधूंकडून दाटल्या कंठाने निरोप; “माझ्या कुंकवाला भारतवासीयांचा आशीर्वाद”



भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रबदींची घोषणा करण्यात आली असली तरी, पाकिस्तानाचा मागील अनुभव पाहता भारतीय लष्कराने सुरक्षेसंबंधी सावध भुमिका घेतली आहे. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने भारतीय लष्करातील जवानांचे मागील आठवडाभरापासून लग्न होत आहेत. लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याने लग्न उरकताच जवान भारत मातेच्या रक्षणासाठी कर्तव्यावर रूजू होत आहेत. मात्र, अंगाला हळद आणि हातावर मेहंदी कपाळी भरल्या मळवटाने नववधू माझ्या कुंकवाला भारतवासीयांचा आशीर्वाद असल्याच्या भावना व्यक्त करत दाटल्या कंठाने भावनिक निरोप देत आहेत.


पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर मोहिम फत्ते केली. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर, पंजाब, राजस़्थान, गुजरातच्या सीमावर्ती भागात ड्रोन, मिसाईल हल्ल्यांचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या नापाक हारकतींना चोख प्रत्युतर देत सर्व हल्ले परतून लावले. या शिवाय सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला भारतीय सैन्य दलाने गोळीबारास जशास तसे प्रत्युत्तर देत पाकिस्तान सैनिकांना सळो की पळो करून सोडले.


दरम्यान, भारतीय लष्करा समोर शरनागती पत्कारुन पाकिस्तानकडून शस्त्रबंदीची विनवणी करण्यात आली. त्यानुसार भारत- पाकिस्तानमध्ये शस्त्रबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र पाकिस्तानचा भुतकाळातील अनुभवांनुसार भारतीय लष्कराने सुरक्षेच्या तैनातीमध्ये तसुभरही कसर सोडलेली नाही. त्यामुळे कौटुंबीक कारणास्तव सुट्टीवर आलेल्या जवानांना तात्काळ कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत .


सध्या लग्न सराईचा कालावधी असल्याने कित्तेक जवानांना लग्न समारंभ उरकून कर्तव्यावर हजर व्हावे लागत आहे. नुकत्याच जळगाव, बुलढाणा जिल्ह्यातील जवनांना हळदीच्या अंगाने नववधूंसह त्यांच्या नातेवाईकांनी कर्तव्यावर रूजू होण्यासाठी रेल्वेस्थानकावर निरोप दिला होता. पाथर्डी (जि.अहिल्यागनर) तालुक्यातील कान्होबावाडी येथील जवान महेश विठ्ठल लोहकरे यांचा (दि.10 मे ) विवाह संपन्न झाला.


लग्न समारंभासाठी गावी आलेल्या जवान विठ्ठल लोहकरे यांना भारतीय लष्कराकडून तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याचा मॅसेज आला आणि देशसेवेला आग्रस्थानी मानत लग्न समारंभाचे सर्व कार्यक्रम उरकून अवघ्या 48 तासांत जवान महेश लोहकरे अंगाला हळद, कुंकवाने माखलेल्या हातांनी कर्तव्यावर रूजू होण्यासाठी निघाले. यावेळी कपाळी मळवट, हातावर ओली मेहंदी आणि अंगाला हळद असलेली त्यांची नवनधू रेल्वेस्थानकावर निरोप देण्यासाठी उपस्थित होती. “माझ्या कुंकवाला 140 करोड भारतवासीयांचा आशीर्वाद आहे” असा दाटल्या कंठाने, थरथरत्या हाताने त्यांनी आपल्या पतीला भावनिक निरोप दिला. त्याचबारोबर आई- वडिल, मित्र परिवारांकडून जवान महेश लोहकरें यांना निरोप देण्यात आला या भावनिक क्षणाने प्रत्यक्षदर्शींच्या ह्रदयात स्थान निर्माण केले.

Comentários


bottom of page