top of page

ओबीसी नेतृत्वात फूट?: लक्ष्मण हाकेंच्या मोर्चाला बबनराव तायवडेंचा विरोध

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ओबीसी आरक्षण आजरोजी संपल्याचा दावा करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी दि.1 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चाचा इशारा दिला आहे. लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी पाठिंबा नसल्याचे जाहीर केल्याने आंदोलनापूर्वीच ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.


ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी 1 सप्टेंबरला मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातील ओबीसी बांधवांसह ओबीसी नेत्यांनाही या मोर्चात सहभागी होण्याचे अवाहन केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या आंदोलना बाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर हाके यांनी भुजबळ यांच्यावर निशाना साधल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर याआधीच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आंदोलनापूूर्वीच ओबीसींच्या नेत्यामधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.


ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणी रोखू शकत नाहीत, नोंदी प्रमाणे प्रमाणपत्राचा कायदा जूना आहे. कुणबी नोंद असणार्‍यांना प्रमाणपत्र मिळणारचं आहे, त्यात काही नविन नाही. मागील काळात एकूण प्रमाणपत्र वाटपा पैकी 20 जणांनी पडताळणीसाठी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 15 हजार पडताळण्या झाल्या 5 हजार रद्द झाले याचा अर्थ 15 कुणबी आहेत. त्यांच्या वंशावळी कुणबी आहेत असं म्हणत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हाके यांच्या मोर्चाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे.


पुढे बोलताना तायावाडे यांनी हाके यांच्या आंदोलनावर भूमिका स्पष्ट करताना सरकारच्या भूमिकेकडे आपले लक्ष असल्याचे सांगितले. सरकार ओबीसी आरक्षणाच्या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही याची खात्री करते का. यावर आपलं लक्ष असल्याचं ते म्हणाले. सरकाराने दिलेल्या अश्वासनांवर ते ठाम रहिल्यास मुंबईत मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे तायवाडे म्हणाले. हाके यांच्या मागण्या स्पष्ट नसल्याचा दावा करत त्यांनी मोर्चाला आपला पाठिंबा नसल्याचेही स्पष्ट केले.


आमचं आंदोलन रामलिला मैदानावर : ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. 2016 पासून केंद्र सरकारकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. जातनिहाय जनगणेच्या प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकानाचा मागणी आहे. यासाठी आगामी काळात सातत्याने पाठपुरवा करण्यात येणार असून, डिसेंबरमध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही तायवाडे यांनी दिला.


लक्ष्मण हाकेंची तायवाडेंवर टिका: तायवाडेंच्या भूमिकेवर लक्ष्मण हाके यांनी प्रत्यूत्तर दिले. बबनराव तायवाडे हे ‘ हव्हेंट नेते’ असल्याची टिका त्यांनी केली. तायवाडे सकाहभ एक दुपारी दुसरी आणि संध्याकाळी वेगळी भूमिका घत असल्याचा आरोपही हाके यांनी केल. “ आम्ही त्यांना पाठिंबा मागितलाच नाही,” असे सांगत हाके यांनी तायवाडे सत्ताधार्‍यांच्या बाजूने भूमिका घेत असल्याचा अरोप केला. वर्षातून एक कार्यक़्रम घेणार्‍या तायवाडेंनी आपल्याला अधिक बोलायला लावू नये असा इशाराही हाके यांनी दिला.


दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरच्या मुंबईतील मोर्चासाठी तयारी सुरू केली आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणर असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, बबनरावा तायवाडे यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने मोर्चापूर्वीच ओबीसी नेतृत्वातील मतभेद अधोरेखित झाले आहेत. त्यामुळे 1 सप्टेंबरच्या मोर्चाला ओबीसी समाजातून किती प्रतिसाद मिळाते आणि या आंदोलनामुळे सरकारवर किती दबाव निर्माण होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page