कॉक्रोच जनता पार्टीची पुढील भूमिका ठरणार!; सीजेपीची टीम छत्रपती संभाजीनगरात दाखल
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर: राजधानी दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा काय? याची अनेकांना उत्सुकता आहे. अभिजीत दिपके यांनी नुकतेच मीडियासमोर लवकरच कॉकरोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीची छत्रपती संभाजीनगर येथे दिपके यांच्या निवासस्थानी बैठकीचे अयोजन करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सीजेपीचे केंद्रीय सदस्य बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत.
कॉकरोच जनता पर्टीची पुढील दिशा ठरवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी दोन दिवसीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी अशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर सहकारी दिल्लीहून छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, सीजेपीच्या बैठकीबाबत सौरव दास यांनी माहिती दिली आहे.
सौरव दास म्हणाले की कॉकरोच जनता पार्टीची दोन दिवस दि.5 आणि दि.6 रोजी बैठक आहे. सीजेपीचे सर्व लिडर आणि प्रवक्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पाच आणि सहा तारखेला आम्ही बसून चर्चा करू की, पुढे आम्हाला काय करायचे आहे. तरुणाईला या चळवळीत कोणत्या दिशेने पुढे न्यायचं हे आम्ही ठरविणार आहोत. सहा तारखेला आम्ही माध्यमांना सांगू की फायनल निर्णय काय झाला.
झारखंडच्या विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा: पुढे बोलताना सौरव दास म्हणाले. झारखडच्या विद्यार्थ्यांना आमचा सपोर्ट आहे. हे आंदोलन पुढे कसे जाईल याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. दोन दिवसीय बैठकीला आम्ही एकूण सीजेपी चे 7 सदस्य आहोत व इतर ज्यांनी सहकार्य केले ते सुद्धा आमच्या सोबत आहेत.
अभिजीत दिपके यांच्या विरोधात तक्रार : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या विरोधात दिल्लीतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी तक्रार दिली आहे. अभिजीत दिपके यांच्या सहकार्यांनी हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत आहे. अभिजीत दिपके यांना तात्काळ अटक करावी, अशी तक्रारीतून मागणी केली आहे. त्यांनी आंदोलनावेळी केलेल्या कारवाईवरून दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलिसांचं कौतुक केलं आहे. तसेच दिपके हे स्वार्थासाठी वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.



Comments