top of page

काय छळ करायचा तो करा!, पण आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई सोडणार नाही

ree

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाच आज तिसरा दिवस. सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पाटील म्हणाले की. 58 लाख नोंदीच्या आधारावर जीआर काढावा मराठा ही कुणबीची पोट जात आहे तसा 2012 चा कायदा सांगतो. व्हॅलेट करायला पोट जात उपजात म्हणून ओबीसीत घ्या. हैदराबाद, सातार बाम्बे गव्हरमेंट गॅझेट बद्दल आम्ही अभ्यासकांशी केवळ चर्चा केली आहे. आम्ही कसलेही डाक्यूमेंट सरकारला देणार नाहीत. सरकारने तेरा महिण्यापूर्वीच डाक्यूमेंट घेतले आहेत. दोन्ही राज्यांच्या सचिवांनी डाक्यूमेंटची देवान घेवान केली आहे.


आता आमची चर्चा एवढीच झाली की काय केलं पाहिजे, सातारा आणि हैदराबाद गॅझेट अस आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा कुणबी आहे. सरकारनं स्वीरणं गरजेचं आहे पहिली प्रक्रिया शिंदे समितीने अभ्यास केला आहे ते कबुल केलं आहे सरकाने तो अहवाल स्वीकारून मागासवर्ग आयोगाकडं द्यायचा हे सरकारने केलं पाहिजे.150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्यामुळं टीकवणं या भानगडीत पडू नये. “ आम्ही खेड्यातले आहोत, अक्कल आहे म्हणून लढा लढतो”


कळत नसेल तर.. समितीचं काम आहे नोंदी शोधनं त्याचा अहवाल तयार करणं, त्यांनी जो अहवाल तयार केला त्याचे तीन खंड बनवले ते सरकारला दिले आहेत. एकदा का सरकारने अहवाला स्वीकारला तर तो देवही रोखू शकत नाही. नोंदणीच्या छाणनीसाठी वेळ मागणीवर पाटील म्हणाले तेरा महिने काय केलं वेळ मिळणार नाही. आंमलबजावणी करून जीआर पाहिजे, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं लागलं तरी बोलवा पण जीआरच पाहिजे.

सरकारची मानसीकता आरक्षण देण्याची नाही, पुढच्या शनिवारी रविवारी आमचे पूरेच येणार आहेत. एकदा का जर आमचे धोतरं आले तर ते कोणालाही मोजत नाही. कायदा कोणाच्या म्हणण्यावर चालत नसतो, एकदा का जर मराठा बाजूला सरकला तर त्यांचा ग्रामपंचायतीचा मेंबरसुद्धा होवू शकत नाही. आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.


आज तिसरा दिवस असला तरी मी काही इथून हाटत नाही, आपली एक तर विजयी यात्रा अन्यथा अंत्ययात्रा इथून गावाकडं जाणार. मी समाजाच्या भल्याला महत्व देतो. आरक्षणासाठी आंगाचं कातडं देखील एका क्षणात काढून देईल. सरकार बैठकाच्या माध्यमातून वेळ काढूपणा करतय. सरकारने मला इथ गोळ्या घातल्या तरी चालतील जेलला नेलं तरी माझं उपोषण सुरूच राहणार यापेक्षा वेगळ काय करू शकतो. आंदोलकांना जर मुंबईत जर काठीनी जरी मारलं तरी पुर्ण महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. शेवटी समाजाचा किंती अंत बघायचा यालाही सीमा असते. शांततेत मोर्चे बैठका करून प्रत्येक वेळेस पदरात अपमान पडलाय. किती दिवस सहन करायचा. गेल्या 45 वर्षापासून घानेरडं होतंय अस्मीता आणि स्वाभीमान जागा होतो त्यावेळेस मेलेला समाज अक्राळ विक्राळ रुप धारण करतो.


समाजाचं अस्तीत्व टिकवायला समाज खंबीर आहे. तशी वेळ आणू नये जर तशी वेळ आली तर देवेंद्र फडणवीस जबाबदार राहील त्यामुळे मोदी,शहांनाही याचे परिनाम भोगावे लागतील. तर तुम्हाला केवळ मुंबईचं बेटच संभाळावं लागणार आहे. मेलो तर बेट सुद्धा तुमचं नाही. देेवेंद्र फडणवीस म्हटले होते अपवादात्मक परिस्थिती झाल्यावर आरक्षण देता येतं त्यावेळी ते विरोधी पक्षात होते. आता तेसत्ताधारी आहेत.


सत्ता नसताना देवेंद्र फडणवीस यांच अंग वेगळं आहे. यावेळी त्यांनी रंग बदलणार्‍या सरड्याचं उदाहरण दिलं. विरेाधात अतसाना पहिल्या कॅबीनेट मध्ये धनगर बांधवांना आरक्षण देईल असं फडणवीस म्हणाले होते. तेच मराठ समाजाबद्दलही बोलले होेते. शेतकर्‍यांची कर्ज माफी होईल पण काहीच केलं नाही. सगळं होणार आहे मी मरेपर्यंत मोकळं सोडणार नाही. यावेळी एका आंदोलकाने मोबाईल दाखवत पोलिस आंदोलकांच्या वेशेत, वाशीमध्ये स्वयंसेवकांचे रुमाल, टोप्या आणि बिल्ले गाळ्यात घालून आंदोलकांची दिशाभूल करत असलेला व्हिडीओ दाखवला.


ते पोलिस आंदोलकांना म्हणत आहेत पाटलांनी सांगितलं परत जायचं. तुम्ही मराठे मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्हाला तुमचे लोकप्रतिनिधि महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावे लागतील. वाशी, ठाणे, कल्याणकडं चाललेले प्रयोग थांबवा फडणवीस साहेब. नितेश राणे यांना चिचूंद्री म्हणत नेत्याला बोलल्या आम्ही सहन करणार नाही, आम्ही 96 कुळी या वक्तव्याचा समाचार घेत त्याचं मंत्रीपद धोक्यात असल्याने बोलत असल्याचे पाटील म्हणाले.


दादा ( नारायण राणे) यांनी त्याला समजून सांगावा गुंडाच्या टोळ्यांना मोजत नाही तुझं कुठं काय आहे हे मला सगळच मला माहित आहे. लाईट बंद करु द्या, काय छळ करायचा ते करा पण मी आरक्षण घेतल्या शिवाय मी इथून उठणार नाही. वाहनांना फाईन लावण्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. पण एक रुपयाही भरायचा नाही. सर्वांनी शांत राहयचं कोणीही सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका असे अवाहनाही मनोज जरांगे यांनी केले.

Comments


bottom of page