कोचाळे जिल्हा परिषद शाळेत 79 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
- Navnath Yewale
- 7 days ago
- 1 min read
मोखाडा: 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथून भर पावसात संपूर्ण गावात लेझिम आणि बँड च्या तालावर प्रभात फेरी निघाली विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वात पुढे होते त्यांच्या मागे लेझिम पथक आणि सर्व विद्यार्थी शाळेत आल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्पार्क फाऊंडेशन या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष . मकरंद दिक्षित आणि जिल्हा प्रमुख . नितीन पिठोले उपस्थित होते . मकरंद दिक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांनी, देशभक्ती गीतांच्या तालावर संगीतमय कवायत आणि लेझिम सादर केली . आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवितील जवळपास 35 विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी मधून भाषणे केली पाहुण्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले . हर घर तिरंगा उपक्रमांअंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षिसांचे वाटप ही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले .
उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले . संध्याकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आयोजन ही करण्यात आले . ग्रामस्थांनी त्यातही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . ग्रामपंचायत सरपंच मुरलीधर कडू साहेब ,उपसरपंच मिलिंद बादादे, माजी सरपंच हनुमंत फसाळे, ग्रामस्थ आणि सर्व शिक्षक उपस्थित होते , मुख्याध्यापक . दिनकर फसाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले .
Comments