खरात प्रकरणात सरकारची पोलखोल,विठ्ठल कांगणेंच‘इन्स्टा’आकाउंट क्लोजसुजात आंबेडकर मैदानात
- Navnath Yewale
- Mar 29
- 2 min read

परभणी : परभणीमधील प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे यांचे इन्स्टाग्राम खातं बंद करण्यात आलं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात खरात प्रकरणात शिक्षक कांगणे यांनी व्हिडिओ शेअर करत सरकारची पोलखोल केली होती. त्यावरुन त्यांचे खाते बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट, विठ्ठल कांगणे यांना समर्थन देत, सरकारविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्णय जाहिर केंला. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी विठ्ठल कांगणे यांची भेट घेतल्यानंतर, जो सरकारचा खरा चेहरा समोर आणले. त्याचा अवाज दाबला जाईल, अशा शब्दात राज्यातील सरकारवल हल्ला चढवला.
भाजप सरकारवर टीका करणारे, सुधारणा सुचवणारे आणि सत्य परिस्थिती मांडणार्यांचा अवाज दाबला जात आहे, असा अरोप करताना, स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विठ्ठल कांगणे सर यांचे इंन्स्ट्राग्राम अकाऊंट बंद का करण्यात याचे उत्तर मिळाले पाहिजे, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.
विठ्ठल कांगणे सर, सोशल मिडियाच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल परखड मत मांडणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करत आहेत. तरीही त्यांचे सोशल मिडिया अकाऊंट सरकारडून बंद करण्यात येत आहे इतकी भीती भाजप सरकारला कशाची वाटते? असा सवाल सुजात आंबेडकर यांनी उपस्थिम केला.
यापूर्वी पुलकित मणी या कॉमेडियनने एक रील बनवली होती, तीही सरकारने हटवल्याकडे सुजात आंबेडकर यांनी लक्ष वेधलं. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असेलेल विठ्ठल कांगणे सर यांचे इन्स्टाग्राम खाते सरकारकडून बंद करण्यात आले. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी प्रा. कांगणे सरांनी सरकारचा पोलखोल करणारा व्हिडिओ बनवला होता. त्या कारणावरून त्यांचे सोशल मिडिया खाते बंद करण्यात आल्याचा संशय सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी सोशल मिडियावरील खाते बंद करून होणार नाही. खरात प्रकरणात अडकलेल्या सरकार, प्रशासनातील मोठ्या लोकांना गजाआड करावे, असे अवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. सरकारच्या मुस्कटदाबीचा निषेध करताना, सरकारच्या हुकूमशाही विरोधात आपण विठ्ठल कांगणे सरांसोबत आहोत. असेही सुजात आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलं.
यातच विठ्ठल कांगणे सर यांची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.“ माझे इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक बॅन करण्यात आलं. याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा ठोस कारण देण्यात आलेलं नाही. मी सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत होतो. त्यांच्या अडचणींवर बोलत होतो आणि व्यवस्थेला थेट प्रश्न विचारत होतो. जर सरकारच विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत होतो, त्यांच्या अडचणींवर बोलत होतो आणि व्यवस्थेला थेट प्रश्न विचारत होतो. जर सरकारच विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळत असेल आणि त्या विरोधात आवाज उठवला म्हणून आमच्या इंस्टग्राम आयडी बंद केल्या जात असतील, तर आयडी बंद करता येतील; पण विचार थांबवता येणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्यांविरोधात आम्ही अधिक ताकदीने मैदानात उतरू, “ असं सुनावलं आहे.



Comments