खालापूरच्या मंगलम कापुर कारखाण्याला भिषण आग
- Navnath Yewale
- Jul 17, 2025
- 1 min read
तत्पर मतदकार्यामुळे जीवित हानी टळली, साहित्य जळून खाक

कार्बन पूड तयार करणार्या खालापूर तालुक्यातील विजयप्रीत कारखान्यात बुधवारी (16 जूलै) रात्री आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी, मोठ्या प्रमाणात कंपणीचे नुकसान झाले आहे. गंभीर बाब म्हणजे याच कारखाण्यात गेल्या वर्षीही आगीची दुर्घटना घडली होती.
खालापूर तालुक्यातील कुंभिवली गावात मंगलम हा कापूर बनवणारा कारखाना आहे. बुधवारी रात्री उशिरा बॉयलरच्या ठिणग्यामुळे कच्चा माल असलेला टायरने पेट घेतला आणि आग झपाट्याने पसरली. आगीची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी तातडीने अग्निशमन दल आणि खोपोली नगरपरिषदेच्या अग्निशमन दलालास पाचारण केले. रबरी टायरने पेटघेतल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. आग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने दोन बंबाच्या साह्याने पहाटपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पालिस अधिकारी विक्रम कदम, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी तात्काळ घटनासथळी धाव घेऊन घटनेचे गांभीर्य राखत उपाय योजनां राबविल्याने आग पसरली नाही. या आगीत जिवीतहानीचे वृत्त नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, कपणीचा कच्चा माल. साहित्य जळल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान एकून 13 एजन्सींकडून अग्निशमन यंत्रणा मदतीला धावली आणि तब्बल चार तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती खालापूर पोलिसांनी दिली.
दुर्घटनाग्रस्त कारखान्यामध्ये कापूर आणि इतर पेट्रोलजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात होते. तरीही अत्यंत शिताफीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत मतदकार्य करणार्या एजन्सींनी आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये हेल्प फाऊंडेशनच्या सदस्यांनी खालापूर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सचिन पवार, आणि मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्नीशमन दल, संसाधनांची जुळवाजूळव, वाहतूकी विषयी यशास्वी उपाय योजना राबवण्यात आल्या.



Comments