top of page

गुगल मॅपवर बॉर्डर करुन पाकिस्तानात पोहोचलेल्या सुनिताच्या खुलाशाने तपास यंत्रणा हादरली




जम्मू- काश्मीच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर ’मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशवादीस्थळ उद्धवस्त केली. बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमवर्ती भागात हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र, भारताच्या सुरक्षादलाने नापाक हरकतींना उधळून लावत जशासतसे प्रत्यूत्तर दिले. भारत- पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे दोन्ही देशात तणाव असताना नागपूरची सुनीता जामदगडे ही बेकायदेशीर रित्या बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात (पीओके) मध्ये पोहोचली होती. त्यानंतर पाकिस्तान सैनिकांनी तिला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या स्वाधीन केलं, त्यांनतर चौकशी करून तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सुनीता जामगडेची आता राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशवाद विरोधी पथक, कारगिल पोलिसांकडूनही चौकशी होणार आहे. तिच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानात जाण्यासाठी सुनिताने गुगल मॅपचा वापर केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.


सुनीता जामगडे अनेक महिन्यांपासून पाकिस्तानमधील धर्मगुरू म्हणून काम करणार्‍या जुल्फीकार यांच्यासोबत समाजमाध्यमातून संवाद साधत होती. तिच्या त्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न होता, अशीही चर्चा आहे. तिला नागपुरात आणल्यानंतर त्या गुप्तचार किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी आहे काय, याचवा तपास नागपूर पोलिसांनी सुरू केला आहे. सुनीता पाकिस्तानमध्ये 4 किमीपर्यंत आत कशी गेली, सुनीताला पाकिस्तानमध्ये जाण्यासाठीचे छुपे रस्ते कोणी दाखविले याचा तपास आता नागपूर पोलिस करत आहेत.

सुनीता कारगिलच्या ज्या भागातून पाकिस्तानात प्रवेश केला, तो उंच डोंगराळ भाग आहे. तिथं माहिती शिवाय जाणं शक्य नाही. पर्वत रांगांशिवाय उंच उंच झाड असल्याने तिथून सामान्य नागरिक जाणं शक्य नाही. त्यामुळे सुनीताला कोणीतरी या सगळ्या मार्गांची माहिती दिली असेल आणि त्या माहितीच्या आधारे सुनीता पाकिस्तानात गेल्याची शक्यता आहे. ज्या भागातून सुनीतांने मार्गक्रम केला त्या भागामध्ये 24 तास पोलिस सुरक्षा देणं सुरक्षा दलाला शक्य नाही आणि त्याचाच फायदा सुनीता आणि तिच्या सहकार्‍यांनी घेतला असल्याची शंका निवृत्त करणल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली.


मोबाईलचा सर्व डेटा डिलीट केला होता:

सुनीता जामगडे हिने तिच्या मोबाईलचा सर्व डेटा डिलिट केला होता, त्यामुळे पोलिसांना संशय आहे. आता नागपूर सायबर पोलिसांनी तज्ज्ञ टीम सुनीताच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनीताच्या मोबाईलमध्ये एक संशयास्पद अ‍ॅप आढळून आले असून त्या अ‍ॅपला डिकोड करणं किंवा रिमूव्ह करण्याचे तंत्र आपल्याकडे नाही. त्यामुळे ते अ‍ॅप सुनीताला कुठून मिळालं? त्याच अ‍ॅपच्या माध्यमातून सुनीता हेरगिरी करत होती का?असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.


सुनीताची उडवाउडवीची उत्तरं:

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगिल येथे गेले. पैसे संपल्यावर तिथे नोकरी शोधली आणि पाकिस्तानात गेली, अशी उडवाउडवीची उत्तर ती देत आहे. असं पोलिसांनी सांगितलं. पण तिचा जबाब, कारगिल पोलिसांची माहिती आणि तिचा मोबाईल डाटा तपासणी केली जाणार आहे.


नागपूरच का निवडलं:

नागपूर शहर अतिशय संवेदनशील ठिकाण आहे त्याचे कारण म्हणजे नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, नागपूर मध्ये ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंट सेंटर आहे. नागपूरमध्ये एअर फोर्सचं मेंटेनन्स कमांड आहे. हवाई दलाची फायटर हेलिकॉप्टर नागपूरात अनेक वेळा असतात. नागपूरमध्ये आरबीआय बँक आहे. त्यामुळे सुनीताने या जागांची हेरगिरी केली असेल तर शत्रू पक्षाला ही माहिती मोलाची असून त्याचा परिणाम सुरक्षेवर होऊ शकतो.


पाकिस्तानात कशी गेली त्याचं रिक्रिएशन करणार :

सुनीता जामगडेला न्यायालयाने दोन जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र दोन जून नंतर न्यायालयाने सुनीताला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे आता या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी कारगिल पोलिसांची एक टीम नगापूरमध्ये दाखल झाली असून कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहे. सुनिताला प्रोडक्शन वॉरंटवर घेऊन कारगिलला नेऊन ज्या भागातून सुनीताने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला त्या सगळ्या जागी नेत रिक्रिएशन करून सत्यता पडताळणी केली जाणार आहे.

Comments


bottom of page