top of page

‘गेट आऊट फ्रॉम हेअर’ भाजपच्या महिला मोर्चात मुंबईकर महिलेनं मंत्री गिरीश महाजनांना झापलंं

मुंबई: संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक फेटाळलं गेल्यानं संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपनं काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात वरळीत महिलांच्या भव्य निषेध मोर्चाचं अयोजन करण्यात आलं हातं. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाल्यानं इथल्या वाहतुकीचा पूरता बोजवारा उडाला होता. मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली, यामुळं या कोंडीत अडकून पडलेल्या एका उच्चभू्र मुंबईकर महिलेचा संताप अनावर झाला आणि तिनं थेट मंत्री गिरिश महाजन यांच्यावर आगपाखड केली. महाजन यांना तोंडावरच तिनं झाप झाप झापलं. यामुळं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.


मंगळवारी (दि.21) वरळीत मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग आणि भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. राजकीय हेतूने केल्या जाणार्‍या अशा आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागतं. त्यामुळं “ तुमचं हे काय चाललं आहे? गेट आऊट फ्रॉम हेअर (इथूून निघून जा )” अशा शब्दांत एका मुंबईकर उच्चभ्रू महिलेनं थेट भाजपच्या मोर्चामध्ये शिरुन थेट मंत्र्यांना याबाबत जाब विचारला. इथं उपस्थित असलेल्या गिरीश महाजनप यांच्यावर ही महिला चांगलीच संतापली. या आंदोलनामुळं सर्वसामान्य जनतेचा वेळ आणि इंधन वाया जात असल्याचा मुद्दा या महिलेनं आक्रमकपणे मांडला. व्हायरल व्हिडिओमध्ये ही महिला गिरीश महाजन यांच्यासोबत तीव्र शब्दांत वाद घालताना दिसत आहे.


दरम्यान, या महिलेनं पोलीस अधिकार्‍यांना देखील जाब विचारला, इथं या मोर्चामुळं वाहतूक कोंडी झालेली असताना तुम्ही काय बघ्याची भूमिका घेत आहात? असा सवालही या महिलेनं विचारला. पोलीस अधिकारी या महिलेला गिरीश महाजनांजवळ जाण्यापासून रोखत होते. पण या महिलेनं माझ्या अंगाला कोणीही हात लावायचा नाही, अशा शब्दांत पोलिसांनाच इशारा दिला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या महिलेला इथून बाहेर काढा अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर ही महिला तिथून स्वत:हून बाहेर निघून गेली.


वरळीत आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपच्यावतीनं मोर्चाचे आयोजन केलं होतं. संसदेत मोदी सरकारनं मांडलेल्या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दर्शवला नाही त्यामुळं भाजपनं महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन आणि पत्रकार परिषदा घेण्याचा कार्यक्रम राबवला आहे. याद्ववारे काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी आणि त्यांचे सहकारी पक्ष हे कसे महिला विरोधी आहेत? हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Comments


bottom of page