वाल्मिक कराड गँगचा तुरुंगात हैदोस; प्रतिक घुले, सुदर्शन घुले यांची कैद्याला जबर मारहाण
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

बीड: मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणातील आरोपी सध्या कारागृहात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सध्या त्यांना कारागृहात ठेवण्यात आलं आहे. सेतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणातील कराड गँगचे एकएक क्रूर कारनामे समोर आले होते. बीड जिल्ह्यातील या गँगची कशी दहशत होती, हे सांगणारे अनेक धक्कादायक प्रसंग समोर आले होते. दरम्यान, आता ही गँग तुरुंगात असली तरीही त्यांचे कारनामे संपता संपत नाही. तुरुंगातच या गँगकडून दहशत पसरवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसण्याच्या जागेवरून या गँगने एका कैद्याला मारहाण केली आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप या तिघांनी मिळून एका कैद्याला मारहाण केली आहे. तुरुंगातील बैरिकेटमध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद झाला होता. अगोदर कैद्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर कैद्याला मारहाण करण्यात आली. कराड गँगच्या सदस्यांनी तुरुंगातील अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला मारहाण केल्याचे बोलले जात आहे.
या कथित मारहाणीसंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये अझर अब्दुल रहमान पठाण हा कैदी बोलत आहे. माझ्या हाताला गंभीर मार लागला आहे. मला मारहाण झाली. जेल प्रशासन माझं काहीही ऐकून घेत नाही. जेल प्रशासनाने त्यांच्याकडून पैसे खाल्ले आहेत. जेलरला याबाबत माहिती दिली. परंतु ते माझं काहीही ऐकायला तयार नाहीत. माझ्यावर दमदाटी केली जात आहे. माझा तुरुंग बदलण्याची धमकी दिली जात आहे, असं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.
तसेच कुठेही तक्रार कर, माझं कोणीही काहीही करू शकत नाही, असं मला धमकावलं जात आहे. मला दवाखान्यातही नेलं जात नाही. मला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. जेलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. असाही उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचाही उल्लेख आहे. वाल्मिक अण्णाकडे मला बोलवलं जात आहे, असाही अरोप या कथित ऑडिओ क्लिपमध्ये होताना दिसतोय, दरम्यान या संदर्भात जेल प्रशासनाने मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा केली परंतु कैद्याने कोणतीही तक्रार केली नसल्याचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले.



Comments