गोजूबावीच्या सरपंचाने सागितला,अजितदादांच्या विमान अपघाताचा थरार ; कल्याण आटोळे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती विमानतळावर विमान लँडिंगदरम्यान अपघातात मृत्यू झाला. ज्या परिसरात हा अपघात झाला तो परिसर गोजूबावी हे गाव आहे. या गावातील सरपंच कल्याण आटोळे यांनी विमान अपघात हा प्रत्यक्ष पाहिला आणित्यानंतर त्यांना काही वेळ विमानाचा दरवाजा उघडा असल्याचं दिसलं. त्यातून निळी पॅन्ट असलेला एक व्यक्ती बाहेर येत असल्याचं काही सेकंद जाणवलं. मात्र तसं काही नव्हतं. त्यानंतर काही वेळात या विमानाचा भयानक असा स्फोट झाला आणि त्यानंतर त्या विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
सरंपच कल्याण आटोळे म्हणाले की, ‘ विमानात अजित पवार असतील, असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.त्यानंतर बारामतीकडून अनेक अजित पवार यांचे जवळचे सहाकरी आले आणि त्यानंतर आम्हाला या विमानात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळलं. मी त्या विमानाच्या जवळ होतो. त्यानंतर मला आजूबाजूच्या सहकार्यांनी आवाज दिला, बाजूला सरका स्फोट होईल. ‘ अपघाती विमान एखाद्या उद्योगपती किंवा व्हीआयपीचे असावे. मात्र ही दुर्दैवी घटना घडली आणि त्यात अजितदादांचा मृत्यू झाला. या संदर्भात माझं आणि आमदार अमोल मिटकरी यांचे कुठलही बोलणं झालं नाही, असंही कल्याण आटोळे म्हणाले.
आज सरपंच कल्याण आटोळे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी घडलेल्या अपघाताची दृश्य सांगितली. या अपघातानंतर पोलीस दल, अग्निशामक दल आणि स्थानिक नगारिकांनी मिळून त्या ठिाकणी असलेल्या मृतदेहांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हा स्फोट एवढा भयानक होता की, खाली पडल्यानंतर खूप मोठा आवाज आला. या विमानात अजित पवार असतील असे आम्हाला वाटले नव्हते. विमानाने अगोदर दोन वेळेस आकाशात घिरट्या घातल्या आणि त्यानंतर उतरत असताना हा अपघात झाला, असंही गोजूबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी शरद पवार यांना सागितले.



Comments