छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन ग्रामस्थ- प्रशासनात जुंपली , तब्बल 46 जणांवर गुन्हे दाखल; बोरी ग्रामस्थांचा बंद पाळून निषेध
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

परभणी : बोरी (जि. परभणी) येथे शिवजन्मोत्सव दिनी गुरूवारी (दि.19) छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा पुुतळा विनापरवाना बसवण्यात आल्याने पोलिस प्रशासनाकडून 46 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. याघटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बोरी गावबंची हाक पुकारली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, बोरी येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी आधीच जागा निश्चित करण्यात आली असून ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील उपलब्ध आहे. त्यामुळे पुतळा बसविण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. प्रशासनाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू केली जाईल आणि सर्व माहितीची खातरजमा केल्यानंतरच पुतळा बसविण्याबाबत निर्णय दिला जाईल असे पोलिसांकउून सांगण्यात आले होते, मात्र शिवजयंतीच्या दिवशीच गावकर्यांनी पुतळा बसवला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी येत तब्बल 46 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ आज बोरी गावबंदचे अवाहान करण्यात आले होते. बोरीकरांनी आज सर्व बाजारपेठ बंद ठेवून या प्रकरणात दाखल खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बोरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आंदोलकांनी हरीपाठ गायला. बोरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज याचा पुतळा बसला यानंतर दारूच्या नशेत पुतळा ओढून फोडण्याचा प्रयत्न करणार्या बीट जमादार दिलावर यांच्यावर कडक कारवाईची मागणी यावेळी आंदोलकांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.



Comments