छावाचे विजय घाडगे यांना मारहाण प्रकरणी जरांगे पाटलांचे गंभीर आरोप
- Navnath Yewale
- Jul 21, 2025
- 1 min read

छावाचे मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना रविवारी (20 जूलै) राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण व इतर कार्यकर्त्यांनी मारहाण केली. शेतकर्यांच्या प्रश्नांवर निवेदन देवून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण याना लाथा,बुक्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात आता जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शेतकर्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रश्नांसाठी निवेदन देवून सभागृहात रमी खेळणार्या कृषीमंत्र्यां विरोधात घोषणाबाजी केल्यावरुन तुम्ही शेतकर्यांच्या लेकराला ( विजय घाडगे) चक्क मारहाण करता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या समोर पत्ते फेकल्याचा तटकरे यांनाच राग आला असावा आणि त्यांनीच हा हल्ला घडवू आणल्याचा खळबळ जनक आरेाप जरांगे पाटलांनी केला आहे. शेतकर्यांच्या लेकराला निवेदन द्यायला गेल्यावर त्याला मारता, आजित पवार यांनी त्या व्यक्तीवर बडतर्फ करायलाच पाहिजे, पण त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजेत असेही जरांगे पाटील म्हणाले.



Comments