top of page

जरांगे पाटलांच्या मागण्यांना बळ कोल्हापूर गॅझेटमध्ये अढळल्या नोंदी!

ree

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटला तात्काळ मान्यता देण्यात आली. त्यानुसार ज्याच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आले. मराठा संदर्भात हैदराबाद गॅझेटची चर्चा सुरू असताना आता कोल्हापूर गॅझेट समोर आले आहे. ज्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आला आहे.


सातारा आणि औंध संस्थानच्या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून वेळ मागून घेण्यात आला आहे. ही चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर गॅझेटची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. आखिल भारतीय मराठा महासंघाकडून कोल्हापूर गॅझेटचा शोध घेण्यात आला आहे. कोल्हापूर गॅझेटची निर्मिती इंग्रजांकडून 1881 साली करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर मराठा आणि कुणबीमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचा सुद्धा उल्लेख कोल्हापूर गॅझेटमध्ये आहे.


तीन लाख कुणबी आणि 60 हजार मराठा

इंग्रजांनी केलेल्या नोंदीनुसार, 1881 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाखाच्या घरात होती. त्यामध्ये तीन लाख कुणबी 60 हजार मराठा असल्याचा कोल्हापूर गॅझेटमध्ये उल्लेख आहे. मात्र, 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख इतकी झाली आहे. लोकसंख्येची पाच पटीने वाढ झाली असताना कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये कुठेही वाढ झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूर गॅझेटमध्ये गफलत कुणी केली? असा सवाल कोल्हापूरातील मराठा समाजाकडून उपस्थित केला जात आहे.

Comments


bottom of page