जरांगे पाटील यांचा अजित दादांना इशारा अजित दादांनी आता धनंजय मुंडे यांना बळ द्यायचं थांबवावं! तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर ...
- Navnath Yewale
- Nov 13, 2025
- 2 min read

बीड: मनोज जरांगे पाटील श्री क्षेत्र नारायणगडावर मंगलकार्यालयाच्या भूमिपुजनासाठी आज बीड दौर्यावर होते. श्री क्षेत्र नारायणगड येथे पत्रकारांशी संवादसाधताना जरांगे पाटील यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत मी नार्कोटेस्टला तयार आहे, मागणी तु केली होती त्यामुळे आता गुमान नार्कोटेस्टला सामोरं जायचं असं म्हणत अजित पवार यांनाही सावधानतेचा इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणत आल्याचा आरोप स्वत: जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर केला आहे. आज श्री क्षेत्र नारायण गड यांच्यावतीने उभारल्या जाणार्या मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं, तर अजित पवारांना देखील इशारा दिला आहे, तसेच, आता आधी धनंजय मुंडे आणि माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून यामध्ये धनंजय मुंडेंची स्टार प्रचारकपदी निवड करण्यात आली आहे. त्यासंदर्भाने मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता, धनंजय मुंडेला डोनाल्ड ट्रम्पसेाबत पाठवलं तरी मला हरकत नाही. मात्र, त्याला आधी तपासणीसाठी पाठवावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, अजितदादा तुमच्या मुलावर घातपात केला असता तर तुम्ही गप्प बसले असते का? त्यामुळे का पांघरूण घालता असा सवालही अजित पवार यांना विचारला आहे. 2029 ला याचा पश्चाताप होईल. मागील निवडणूक आठवा, तुमच्या तोंडाचे पाणी पळाले होतं हे मी माध्यमांसमोर बोलेल, त्याला पाठवा नाही तर 2029 ला तुमची फजिती होईल, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला. धनंजय मुंडला असे चाळे शोभत नाहीत, बीडमधून अजितदादा तुम्हाला एक सांगतो त्याला चौकशीसाठी लवकर पाठवा, असे जरांगे पाटील म्हणाले.
नारायणगडावर मी भक्त म्हणून आलो, इथं बर्याच सुविधा केल्या जात आहेत. मला जीवे मारण्याचा कट रचला, त्यात नार्को टेस्टची मागणी मी केली नव्हती. धनंजय मुंडे माझ्या घातपातापर्यंत गेले आता सुट्टी नाही, लपायचं नाही दोघेही सोबत जाऊ, असे म्हणत नार्को टेस्ट करायचीच आता सगळंच बाहेर येऊ द्या, असे जरांगे पाटील म्हणाले. कांचन नावाचा त्यांचा माणुस ज्याने या दोघांना घरी येऊन परळीला नेले, ते परळीला गेले म्हणजे परळीत खुनाचा कट शिजला होता. धनंजय मुंडे आणि त्यांच्या साथीदाराने मिळून हा कट रचला हे सत्य उघड होणार आहे. अजित दादाने संभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये, प्रत्येकवेळी त्याला वाचवायचं नाही, हे मोठे षडयंत्र आहे, धनंजय मुंडेंनी या टोकापर्यंत जायला नको होतं. मी आता सोपा नाही, हे बाईसारखे धंदे आहेत, धनंजय मुंडे यांना शेखचिल्लीची उपमा देत जरांगे पाटील यांनी अजित पवारांनाही इशारा दिला. मुख्यमंत्र्यांना देखील मी सांगितले आहे, यात माघार नाही.
मी निरोपही पाठवले होते: मी चुकलो कुठे हे मला दाखवून द्या. मी बहीण भावाला कधीही विरोध केला नाही, ते माझ्यावर टीका करत असताना मी त्यांना निरोप देखील पाठवले. निरोप देण्यासाठी त्यात दोन अधिकारी आणि मोठा नेता होता. पण, ते मराठा समाजावर अन्याय करतात मग मला बोलावं लागेल, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात असे नव्हते. चुकीच्या गोष्टींना धनंजय मुंडेंनी साथ दिली, पाठीशी घातले पंकजा मुंडे म्हणाल्या शांतता राहिली पाहिजे ही गोष्ट आम्हाला पटली. पूर्वी ऊसतोड मुकादम- कामगार ईमानदार होते. मात्र, धनंजय मुंडेंनी नंतर त्यांना बळ दिले. आता नार्को टेस्टमधून दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असेही जरांगे पाटील म्हणाले.



Comments