top of page

जव्हार -त्र्यंबकेश्वर महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेले खड्डे तरुणांनी श्रमदानातून बुजवले

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियेतेवर स्थानिकांचा संताप


ree

मोखाडा: जव्हार नाशिक महामार्गावर चिंचुतारा येथे पडला भला मोठा व फुटभर खोल खड्डा पडलेला होता त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी,चारचाकी वाल्यांना वाहन चालवताना अनेकांना त्रास सहन करावा लागत होता या घटनेची माहिती होताच मोरचोंडी येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जमशिद शेख व स्थानिक चालक मालक वसीम शेख,भागिरथ भोये,अरविंद राऊत, फैयाज शेख यांनी आपल्या श्रमदानातून तो खड्डा बुजविला.


सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजवेल असे या तरुणांनी काम केले आहे असे स्थानिक नागरिक व चालक मालक सांगत आहेत. चिंचुतारा परिसरातील हा खड्डा महत्त्वाच्या जव्हार नाशिक महामार्गावर असताना त्यात पाणी साचल्यामुळे प्रवाशांना त्याचे अचूक भान राहत नव्हते.यामुळे विशेषत: रात्रीच्या वेळी वाहतूक करणाऱ्यांचे अपघात झाले होते व अजून होण्याची शक्यता अधिक होती.काही दिवसांपासून या खड्ड्यामुळे दुर्घटना होण्याच्या घटना समोर येत होत्या,मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीची दुरुस्ती होण्याचे काम झालेलं नव्हते.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जमशिद शेख यांच्या नेतृत्वात एकत्र येत स्थानिक तरुणांनी येऊन खड्डा बुजविला.


  माहिती नुसार,स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जमशिद शेख यांचे म्हणणे आहे, की"महामार्गावरील ही स्थिती लाजीरवाण्या सारखी आहे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवर कामे केली असती तर या खड्ड्यात अपघात झाले नसते आम्ही आमच्या तरुण मित्र मंडळी सहभागाने हा खड्डा बुजविला आहे.म्हणजेच प्रशासनाला जागरूक करणे हा आमचा उद्देश आहे."तर त्यांच्या नेतृत्वातील तरुणांनी सांगितले, की"घटनास्थळ जवळच असल्यामुळे अपघात होण्याची भीती वाटत होती.त्यामुळे आम्ही आपल्या जनतेच्या भल्यासाठी व अपघात होऊ नये म्हणून एक सामाजिक जबाबदारी म्हणून गेलो."


   या दुर्घटनेमुळे जव्हार नाशिक महामार्गावरील वाहनचालकांची सुरक्षितता प्रश्नाखाली आली असून,पावसाळी हंगामात अशा प्रकारच्या खड्ड्यांमुळे प्रवास अधिक धोकादायक होत आहे.त्यामुळे स्थानिक प्रशासनाने महामार्गांच्या देखभालीवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय गंभीर अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनीही सतर्क राहावे,अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावी व योग्य ठिकाणी सूचना फलक, क्रॅश बॅरियर पडलेल्या अवस्थेत असलेले दुरुस्ती करणे गरजेचे आहे.


   या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला स्थानिकांचे कठोर त्याग आणि कृती लक्षात घेऊन पुढील काळात अधिक जबाबदारीने बांधकाम करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी स्थानिक लोकांच्या वतीने सरकारी कार्यप्रणालीतील कमतरता उघड करण्यात आली आहे.

Recent Posts

See All

Comments


bottom of page