top of page

जाटनांदूर परिसरातील पूरग्रस्त, गरीब गरजूंना साहित्यांचे वाटप

प्रवरा मेडिकल ट्रस्ट, तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्या पुढाकारातून आपत्तीग्रस्तांना मिळाला दिवाळीचा गोडवा

ree

बीड : मागील पंधरावाड्यात ढगफूटीसदृष्य मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या महापुराने शिरुर कासार तालुक्यातील जाटनांदूरसह परिसरातील शेतजमीन पिकांसह खरडून गेली.


हाता-तोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावल्याने संकटाशी दोन हात करणार्‍या हतबल शेतकरी-शेतमजुर, गरीब,गरजूंना दिवाळी सनासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या सहकार्याने शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख सोपान (काका) मोरे यांच्या पुढाकाराने अवश्यक किराणा साहित्यांसह उबदार कपड्याचे किट वाटप करण्यात आले. दिवाळीत आधार मिळाल्याचे समाधान होत असून सोपान (काका) मोरे यांच्या माध्यमातून दिवाळी गोड होणार असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.


महापूराने संसार उघड्यावर आला, पिकांसह शेती खरडून गेली. दावनीचे जनावर वाहून गेली अशा एक ना आनेक संकटात बुडालेला शेतकरी, शेतमजुरांसमोर जगण्यासाठी डोंगराएवढे संकट आहे. त्यातच दिवाळी सणाचा उत्साहावर जणू वेदणांच विर्जन पडलं असावं!. त्यातच दिवाळीच्या तेजोमय प्रकाशाने संकटाचा अंधार दूर होईल का? या आशेवर असलेल्या जाटनांदूर गणातील गावखेड्यांसह वाडी वस्ती तांड्यावरील शेतकरी, शेतमजूरांसाठी धावून आले ते शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सोपान (काका) मोरे.

ree

प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या पुढाकराने तालुका प्रमुख सोपान (काका) मोरे यांनी अथक परिश्रम करून जाटनांदूर ग्रूप ग्रामपंचायत, जेधेवाडी, भिलारवाडी, मुळीकवाडी, मोरजळवाडी, सवसवाडी, वडाळी, उखळवाडी, चाहूरवाडीतील गरीब गरजूंना थेट घरपोहोच किराणा साहित्यांसह उबदार कपड्यांच्या किटा वाटप केल्या. ऐन दिवाळीत आवश्यक साहित्यांचा आधार मिळाल्याने समाधान व्यक्त करत सोपान (काका) मोरे यांच्या रुपाने दूतमिळाल्याच्या भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.

Comments


bottom of page