top of page

जालन्यात गुणरत्न सदावर्तेच्या गडीवर हल्ल्याच प्रयत्न


अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवार मराठा आरक्षण आंदेालकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना वेळीच ताब्यात घेतले. सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कारवर दगडफेक करण्यात आली.


मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीतून विरोध करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि इतर आंदोलकांवर टीका केली आहे. हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्यादेखील संविधानविरोधी असल्याची भूमिका सदावर्ते यांनी मांडली आहे. त्यावरून मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये त्यांच्याविरोधात रोष आहे.

जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृतद्धी महामार्गे जालना येथे आले होते. यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या तफ्यावर मराठा समाज बांधवांनी दगडफेक करत हल्ला केला. यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तात्काळ पोलिसांनी या आंदोलकांना तब्यात घेतले. या गोंधळा नंतर सदावर्ते हे जालन्याच्या दिशेने उपोषण स्थळी रवाना झाले.


Comments


bottom of page