जैन मुनी पुन्हा बरळले: शिवरायांशी, नितेश राणेंची तुलना! राज्यभरातून संताप; जरांगे पाटीलांचा इशारा; आमदार मिटकरींचा मुनींना सल्ला
- Navnath Yewale
- 12 hours ago
- 2 min read

मुंबई : महाराष्ट्रात कोणीही उठावं आणि महापुरषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करावीत ही मालीका काही थांबण्याचे नावं घेत नाही. जणू काही प्रसिद्धीसाठी सुरू असलेल्या खटाटोपामुळे मात्र, जनतेच्या भावनांचा खेळ मांडला जात आहे. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच, आता मुनी निलेशचंद्र यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि भाजप नेते नितेश राणे यांची तुलना केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमात नितेश राणे यांच्या उपस्थितीत बोलताना मुनी निलेशचंद्र यांनी राणेंचं तोंडभरुन कौतुक केलं. मात्र, हे कौतुक करताना त्यांनी वापरलेली उपमा निषेधार्य तर आहेचे पण बोलताना कोणाविषयी आणि काय बोलतो हे स्तूतीच्या ओहोटीत बुडालेले मुनी म्हणाले की, ‘ नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच आहे’ म्हणजे त्यांच्या वाक्याचे दोन वेगळे अर्थ होत असले तरी प्रत्यक्ष त्यांनी जानिवपूर्वक हे वक्तव्य केले आहे का? असा प्रश्न सामन्यांतून उपस्थित होत आहे.
शिवाय नितेश राणे यांनी केवळ मंत्रीच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. नितेश राणेंची भूमिका ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच आक्रमक असल्याचे त्यांनी म्हटले. मालेगाव किंवा मालवणमध्ये जेव्हा जातीय तणाव निर्माण झाला, तेव्हा नितेश राणे तिथे सर्वात आधी पोहोचले असं सांगत त्यांनी राणेंवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
यावरच मुनी थांबले नाहीत तर त्यांनी विरोधकांना इशाराही दिला, छत्रपती शिवाजी महाराज हे नितेश राणे यांच्यात आहेत. त्यामुळे त्यांच्याशी ईर्षा करू नका. ‘कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल’ असे विधान त्यांनी भर सभेत बोलताना केले. विशेष म्हणजे हे सर्व बोलले जात असताना नितेश राणे स्वत: मंचावर उपस्थित होते.
या जैन मुन्यांना फटके खायचेत का? : जैन मुनी निलेशचंद्र यांचा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी चांगलाच समाचार घेतला. या जैन मुनींचे डोके सडले आहे का? यांचे रक्त बदलले आहे का? या जैन मुन्यांना फटके खायचे आहे का? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या देवतावर असे बोलत असेल तर आम्हाला रस्त्यावर नाविलाजाने उतरावे लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
अमोल मिटकरींचा मुनींवर निशाना : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत जैन मुनींवर निशाना साधला, भगवानर महावीर यांनी मानवतेचा संदेश दिला होता. मात्र काही जैन मुनी वादग्रस्त विधान करून चर्चेत रहाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा अरोप मिटकरी यांनी केला. शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, याचे भान जैन मुनी यांनी ठेवावे, असेही मिटकरी म्हणाले. इतिहासाची माहिती नसेल तर अशा प्रकारची विधाने करू नयेत असा सल्लाही आमदार मिटकरी यांनी दिला.



Comments