top of page

तनाव निवळला : अंजनगावातील पुतळ्याबाबत तोडगा निघाला , खेलोबा मंदिर पुजार्‍यांचे आंदोलन मागे

सोलापूर: माढा तालुक्यातील अंजगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक आणून बसवल्याने निर्माण झालेल्या वादावार अखेर आज तोडगा निघाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याबाबत दोन्ही समाजाचे एकमत झाले आहे. त्यामुळे आता या पुतळ्याचे स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधतील. या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून अंजनगावात जातीय तेढ निर्माण झाली होती.


राज्य स्तरावर या मुद्याची प्रचंड चर्चा झाली. त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक रजाकारण्यांकडूनद या मुद्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी शुक्रवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी सुनील फुलारे, नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि मराठा समाज प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला.


पुतळा बसवलेली जागा देवस्थानची असल्याने ग्रामस्थ आणि मराठा समाज उद्या जी जागा पसंत करेल तिथे पुतळ्याचे स्थलांतर होणार,असे ठरले आहे. त्यादृष्टीने आता तात्काळ जागेचा शेाध घेतला जाईल. अंजपगावात स्थलांतरित जागेवर पुतळा उभारणीच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लगेच मंजूर करणार आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक ग्रामस्थांसोबत गावात फिरुन जागा निश्चित करतील. खेलोबा मंदिराच्या आवारात अचानक पुतळा आणून बसवल्याने वाद निर्माण झाला होता. त्यासाठी अंजनगावातील मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी अमरण उपोषण सुरू केले होते. या सगळ्यामुळे गावात आणि तालुक्यात तणाव निर्मा झाला होता.धनगर समाजाकडून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री यशस्वी तोडगा निघाल्यानंतर खेलोबा मंदिराचे पुजारी फरांडे महाराजांनी आंदोलन मागे घेतले.


दरम्यान, तोडगा निघाल्यामुळे चौथ्या दिवशी अंजनगाव खेलोबा गाव तणावमुक्त झाले. धनगर आंदोलकांनीही पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राजन मालक पाटील यांच्या शब्दाचा मान ठेवत काढलेल्या तोडग्यास संमती दिली. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेली आंदोलनाची जागा मोकळी झाली. यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह बाहेरून आलेले सर्व नेते आणि कार्यकर्ते माघारी परतले. मराठा समाजाच्या आंदोलकांनी हे आंदोलनस्थळ शुक्रवारी रात्री मोकळे केले.


अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर तोडगा निघाला. पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याची पुढे आले. याबात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची मध्यस्थी बैठक यशस्वी ठरली. या बैठकीत दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी पुतळ्याच्या जागेबाबत सहमती दर्शवली आहे. तसेच पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची आसल्याने शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाने देखील मान्यता दिली.


त्यामुळे अंजनगाव तणाव मुक्त झाले आहे. विशेष म्हणजे या सगळ्यांमध्ये आंदोलन संपले. आणि अंजनगावातील दोन्ही गटातील आंदोलक लोक हे रात्रीच घरी गेल्याचे दिसून आले. सध्या अंजन गावात कुठलेही आंदोलन नसून पोलिसांचा मात्र बंदोबस्त कायम आहे. दरम्यान, आज दिवसभरात अंजनगाव येथे दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींकडून प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत स्थलांतरित पुतळ्याच्या जागेची पाहणी करण्यात आली. यानंतर पुतळा स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Comments


bottom of page