तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विमान इराक- इराण पाडणार होते -रोहित पवारांचा धक्कादायक दावा
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 2 min read

मुंबई: अजित पवारांच्या विमान अपघातातील कंपनी व्हीएसआर वर बेजाबाबदारपणाचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच विमान इरान पाडणार होतं असा खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार मुंबई येथील आयोजीत पत्रकार परिषदेत अजितदादांच्या विमान अपघाताच्या डीजीसीएच्या प्राथमिक अहवालावर बोलत होते.
दिवंगत अजितदादांच्या बारामती विमान अपघात प्रकरणी चार दिवसांपूर्वी डीजीसीएचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाला. डीजीसीएच्या अहवालावर अक्षेप घेत रोहित पवार यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत सादरीकरणाद्वारे धक्कादायक दावे केले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2023 मध्ये व्हिएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परदेशात शिंदेचे विमान पाडले गेले असते. जो प्रकार अजितदादांसोबत झाल जसाच काही प्रकार शिंदेसोबत बाहेर होणार आहेता का असा प्रश्न उपस्थित करत या बाबत एकनाथ शिंदे सांगू शकतात असं विधान आमदार रोहित पवारयांनी केलं आहे.
पत्रकार परिषदेत डीजीसीएच्या अहवालावर नाराजी व्यक्त आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या 2023 च्या दावोस दौर्याचा उल्लेख केला. रोहित पवार म्हणाले की, 16 ते 20 जानेवारी 2023 या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूषण गगराणी व्हिएसआर कंपनीच्या व्हीटी -सीएमआर या विमानातून प्रवास करत होते. या विमानात अमित शुक्ला पायलट इन कमांड होते. मुंबईतून या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पहिल्यांदा इंधर भरण्यासाठी ते बहरीन येथे थांबले. त्यानंतर बहरीनमधून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात होते. तेव्हा ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्यामुळे या विमानाला परत जाण्याचा आदेश देण्यात आला, अन्यथा इराणी लढाऊ विमानांकडून ते पाडले जाईल असा इशाराही दिला होता असं रोहित पवार म्हणाले.
इराणच्या धमकीनंतर या विमानाने मार्ग बदलून इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु तेथेही तात्काळ हवाई क्षेत्र सोडण्याचा आदेश विमानाला देण्यात आला. इराणसोबत इराकनेही हे विमान पाडण्याचा इशारा दिला. त्यानंतर इंधन कमी असल्याने हे विमान पुन्हा बहरीनला आले. तिथे 3 तास हे विमान थांबले. तिथून आवश्यक परवानग्य घेऊन हे विमान झुरिचकडे रवाना झाले. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत व्हीएसआर कंपनीकडून असा प्रकार करण्यात आला त्यावरून ही कंपनी किती बेजबाबदारपणे वागत होती हे लक्षात येते असंही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, आमच्याकडे जी माहिती आली ती समोर आणली आहे. व्हीएसआर कंपनीवर विश्वास ठेवता येत नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेबाबत हे घडलं याची माहिती मिळाली. व्हीएसआर कंपनीवर यूएई ने सहा महिन्यासाठी बंदी आणली होती. कोविडच्या काळात लोक अडचणीत होते तेव्हा पैसे कमवण्याच्या नादात रुग्णांकडून भरमसाठ पैसा व्हीएसआर कंपनी घेत होती. प्रायव्हेट चार्टर विमान एक व्यक्ती कंपनी बुक करू शकते परंतु त्यातील सीट विकता येत नाही त्यासाठी तुम्हाला व्यावायिक परवानगी लागते. व्हीएसआर कंपनीने या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे यूएई मध्ये त्यांनासहा महिन्यासाठी बंदी आणली होती असा अरोपही रोहित पवार यांनी केला.



Comments