तुळजा भवानी मंदिराचा वादग्रस्त फतवा; सोन्याची अंगठी, असो वा चुकून दानपेटीत पडताच ‘देवाचा’
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

पुणे: महाराष्ट्रातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर हे साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. लाखो भाविक दरवर्षी येथे जातात. मात्र सध्या तुळजापूरच्या तुळजाभवनी मंदिर संस्थानाचा एक निर्णय वादग्रस्त दठरताना दिासात असून त्यामुळे भाविक प्रंचड संतापले आहेत. पिंपरी चिंचड येथील भाविक संरज टिंगरे यांच्यासोबत तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात घडलेला प्रकार सध्या भाविकांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारा ठरत आहे. देवीच्या दर्शनासाठी श्रद्धेने आलेल्या टिंगरे यांची सुमारे एक तोळ्याची सोन्याची आंगठी चुकून दानपेटीत पडली आणि त्यानंतर सुरू झालेला न्यायासाठीचा संघर्ष आजही अनुत्तरित आहे.
दरम्यान, पिंपरीचे भाविक सुरज टिंगरे हे दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनावेळी दानपेटीत पैसे टाकताना हातातील सोन्याची आंगठी थेट दानपेटीत पडल्याचे टिंगरे यांच्या लक्षात आले. अंगठी दानपेटीत पडल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला. कोणत्या दानपेटीत, कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी अंगठी पडली, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. संबंधित अंगठीचा फोटोही प्रशासनाकडे सादर करण्यात आलाश. इतकेच नव्हेक तर सत्यता पडताळफन अंगठी परत मिळावी, यासाठी मंदिर संस्थानकडे त्यांनी लेखी अर्जही दाखल केला.
मात्र दोन महिने उलटूिहिी अंगठी परत मिळण्याऐवजी मंदिर संस्थानने त्यांचा अर्ज थेट निकाली काढत धक्कादायक भूमिका घेतली. मंदिर संस्थानाच्या ठारावानुसार दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू ती चुकून पडलेली असली तरी परत देता येणार नाही. असे लेखी उत्तर सुरज टिंगरे यांना देण्यात आले. या निर्णयाने टिंगरे यानां मानसिक धक्का बसला असून, श्रद्धेच्या ठिकाणीच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.



Comments