राज्यातील बड्या आयएएस अधिकार्याचे निलंबन मागे, अचानक निर्णय बदलला
- Navnath Yewale
- Mar 10
- 1 min read

मुंबई : चंद्रपुर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्यावरद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात माहिती दिली की, चंद्रपुरमधील पर्यावरणविषयक गंभीर समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वारंवार बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, एमपीसीबीचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकांना सातत्याने गैरहजर राहिले. यावेळी पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या, माझ्या आदेशानंतरही आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग हे बी्रफीनगसाठी हजर राहिले नाही. या गंभीर विषयाची दखल घेत अखेर त्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकउून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी विधानसभेत तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते.
दरम्यान सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन दिले. एमपीसीबीचे अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी पुरावे सादर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, संबंधित दोन्ही अधिकार्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे निलंबनाचे निर्देश रद्द करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या निर्देशानुसार निलंबन मागे घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
एम देवेंद्र सिंग हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आहेत. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित होती. त्यानुसार त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे संबंधित आदेशात म्हटले आहे. अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने ही कारवाई करण्यात आली होती.



Comments