top of page

थरकाप उढविणार्‍या क्रूर हत्येने अवघा महाराष्ट्र हळहळला ‘त्या’ महादेव मुंडेंना न्याय मिळणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी घेतली महादवे मुंडे कुटुंबीयांची भेट



मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्ये नंतर परळी येथील व्यवसायीक महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्ये प्रकरण समोर आले. महादेव मुंडे यांच्या मारेकरी अद्याप मोकाट आहेत. न्यायासाठी ज्ञणेश्वरी मुंडे गेल्या 22 महिन्यापासून यांनी शासन, प्रशासनाचे उंबरे झिजवत आहेत. वाल्मीक कराडचा एकेकाळचा सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे हत्येचा घटनाक्रम पटलावर आणत आरोपींची नावांचाही दावा केला. ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, महादेव मुंडे कुटुंबीयांच्या न्यायासाठी मनोज जरांगे पाटील, सुप्रिया सुळे, बजरंग सोणवने आदींनी भेट घेूवन सांत्वन केले. आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी महादेव मुंडे कुटुंबीयांची परळी येथे भेट घेतली.


परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकार व प्रशासन व्यवस्थेचे वाभाडे काढले. आमदार रोहित पवार म्हणाले की, वाल्मीक कराडचे श्री आणि सुशील कराड या दोन मुलांसह गोट्या गिते यासह आणखी काही लोकांनी परळी तहसील कार्यालयासमोर रात्री 9 :00 च्या सुमारास महदेव मुंडे यांची अत्यंत क्रूर पणे विकृतीलाही लाजवेल अशा पद्धतीने हत्या केली. मारेकरी महादेव मुंडे यांच्या मानेचा तुकडा सोबत घेवून गेले ज्याचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात आहे. पूर्वी वाल्मीक कराड सोबत काम करणारे बाळा बांगर हे आता लोकांसाठी, माणुसकीसाठी न्यायाची बाजू घेवून खरं काय आहे ते समाजासमोर आणत आहेत. मी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पोलिस अधिक्षकांना फोन केला. एफआयआर मध्ये जी नावं यायला पाहिजे होती ती अत्तापर्यंत आलेली नाहीत.


सुप्रियाताई सातत्याने ज्ञाणेश्वरी ताईंच्या संपर्कात आहेत त्यांच्या आरोग्या विषयी विचारपूस करत आहेत. आव्हाड यांनी स्वत: पाठपुरवा करत आहेत. सर्व जाती धर्माचे लोक बरोबर आहेत. एसपींना जेव्हा बोललो, त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालं नाही. एवढे पुरावे आहेत, सीडीआर यासह इतर माहितीचा डम केला होता. याशिवा या प्रकरणात आणखी माहिती गोळा करण्यासाठी सरकारकडून खर्च करायला हवा होता पण त्यावेळेस हत्येच्या नंतर काही महिण्यापूर्वी स्वत: सतिष फड यांनी आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी दिड लाख रुपये स्वखर्चातून चांगल्या एक्सपर्ट कडून ती माहिती काढली आणि ती नावं पुढं आले. परवा बाळा बांगर यांनी जे फोटो व्हायरल केले ते अतिषय क्रूरतेचा कळस गाठणारे आहेत सबंधं या प्रकरणात न्याय हवा आहे. तसं सबंधं महाराष्ट्राला आशा आहे. तपासाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीची काहीच हालचाल दिसून येत नाही.


त्याकाळात संतोष साबळे नावाचे जे पीआय होते. त्यांना या एसआयटीमध्ये घेण्यात यावं अशी इच्छा ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली. आयजी मिश्रा, उमाप यांच्याशी बोललो, तो त्यांचा अधिकार आहे. पीआय साबळे जालना जिल्ह्यात आहेत. न्याय हवा आहे. याशिवाय पंकज कुमावत यांचाही एसआयटीमध्ये समावेश करावा अशीही मागणी आहे. हा विषय तो इथ कोणाच्या अख्त्यारीत नाही तो आहे रश्मी शुक्ला ज्या पोलिस महासंचालक आहेत त्यांच्याकडे आहे. त्यांना फोन लागला नाही पण त्याचा आम्ही पाठपुरवा करू. या गरिब महिलेचं म्हणणं असं आहे की, आम्हाला सीएम साहेबांना भेटायचं भेटू दिलं जात नाही,


आम्हाला इथल्या पालकमंत्री साहेबांना भेटायचं आहे, त्यासाठी आम्ही गेलो होतो पण पोलिसांनी भेटू दिलं नाही. एकनाथ शिंदे यांना भेटायचं सत्तेत असलेल्या प्रत्येकांना भेटून आम्हला फक्त न्याय द्या अशी मागणी करत आहेत. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, हा परिवार जो बोलत आहेत तो पुराव्यासह बोलत आहे. त्यांच ऐका आणि न्यायासाठी बाजू समजून घ्या. आम्ही आमच्या परीने मदत करणार आहोत. या परिवारासोबत सर्व जाती धर्माचे लोक खांद्याला खांदा देवून आंदोलनासाठी बसले होते. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. सामाजिक कामासाठी आंदोलन करणार्‍यांवर तुम्ही कारवाई करत असाल,परळी तालुक्यातील जनता खूप चांगली,हुशार आहे.


मोजक्या लोकांमुळे तुम्ही या लोकांवर कारवाई करत असाल तर हे मान्य केलं जाणार नाही. सतिष फड आणि ज्ञाणेश्वरी मुंडे परिवाराला पोलिस संरक्षण दिलं पाहिजे. कारण श्री कराड (वाल्मीक कराडचा मुलगा) याची काही लोकं इथं आहेत, गांजा विक्री करणे यासह विविध बेकायदेशीर कृत्य करणारी लोकं उद्या या परिवाराचं काहीही करू शकतात. त्यामुळ याची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी. वाल्मीक कराड व त्याच्या परिवारातील काही लोक यात असतील त्यांची नावे एफआयआर मध्ये घेतली पाहिजे. काल परवा एकनाथ खडसे यांच्या जावयाला आत टाकण्यासाठी पोलिस थेट कुत्रे घेवून धावपळ करत होते. म्हणजे एखाद्या विरोधातल्या राजकारण्याला गुतवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागते आणि इथं आपाली बहिण गेल्या

Comments


bottom of page