थेरोंडा मोरेपाडा येथील धोकादायक डीपी तातडीने हटवा
- Navnath Yewale
- Jul 30
- 1 min read
'आदिवासी युवा शक्ती फाऊंडेशन'ची मागणी

डहाणू; थेरोंडा मोरेपाडा येथील वीज वितरणासाठी लावलेली डीपी ही सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून, केबल व वायर झिजून टाकावू स्थितीत गेल्याने संपूर्ण परिसरात जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे "आदिवासी युवा शक्ती फाऊंडेशन, महाराष्ट्र" या सामाजिक संस्थेने महावितरणकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.संस्थेचे अध्यक्ष महेश घाटाळ यांनी सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, सद्यस्थितीत डीपीमधील केबलमध्ये वारंवार शॉर्टसर्किट, स्पार्क आणि संभाव्य स्फोटाची शक्यता निर्माण होत आहे. नागरिकांच्या दैनंदिन हालचालीच्या ठिकाणीच ही डीपी असल्याने, जरी केबल एकमेकांना लागल्या किंवा तुटल्या, तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, असा गंभीर इशाराही संस्थेने दिला आहे.
तत्काळ उपाययोजना म्हणून त्यांनी दोन पर्याय सुचवले आहेत की ही डीपी रॉडसकट दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी,किंवा झिजलेल्या केबल कापून, नवीन नट-बोल्ट प्रणालीसह ट्रान्सफरमार्फत योग्य रीतीने पुनर्जोडणी करावी.या निवेदनावर महेश घाटाळ यांच्यासह संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून गावकऱ्यांच्या वतीने ही मागणी अधिक ठामपणे मांडली आहे. महावितरणने तत्काळ दखल घेऊन काम हाती न घेतल्यास कोणत्याही संभाव्य दुर्घटनेस महावितरण जबाबदार राहील, असेही संस्थेन स्पष्ट केले आहे.ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना झालीच पाहिजे, अशी अपेक्षा आता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.



Comments