धक्कादायक; भारतीय लष्कराच्या वाहनाचा अपघात, दोन लष्करी अधिकारी शहीद
- Navnath Yewale
- Jul 30, 2025
- 1 min read

लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. लष्करी ताफ्याच्या वाहनावर रगड पडल्याने 2 लष्कारी अधिकारी शहीद झाले तर इतर 3 अधिकारी जखमी झाले आहेत. जखमींना विमानाने लेह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लष्करी ताफ्याचा ताफा दुरबुकहून चोंगताश येथे नियमित फेरीसाठी जात होता. गंभीर जखमींमध्ये दोन मेजर आणि एक कॅप्टन यांचा समावेश आहे.
या अपघातात 14 सिंध हॉर्सचे लेप्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग शहीद झाले आहेत. मेजर मयंक शुभम (14 सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (60 सशस्त्र) जखमी झाले आहेत. लेह यग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सर्व अधकिरी कर्तव्यादरम्यान प्रवास करत होते.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहित नुसार ‘ जखमी सैनिकांना लेहच्या 153 जीएच येथे नेण्यात आले आहे’. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, 30 जूलै रोजी सकाळी 11:30 वाजता लडाखमध्ये लष्करी ताफ्याच्या वाहनावर दरडीवरून दगड पडला. सध्या बचाव कार्य सुरू आहे.
गलवान खोर्यात पावसाळ्याच्या महिन्यात डोंगराळ प्रदेश आणि उंचावर बांधलेल्या रस्त्यांमुळे भूस्खलनाचा धोका असतो. समोर आलेल्या अपघाताच्या पहिल्या छायाचित्रात लष्कराच्या ट्रकला मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. छायाचित्रे पाहून अंदाज येतो की, हा अपघात किती भयानक असेल.
या वर्षी मे महिन्यात जम्मू- काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात लष्कराचे एक वाहन अपघाताचे बळी ठरले होते. जिल्ह्यातील बॅटरी चष्माजवळ रामबन अपघात झाला होता. हा अपघात इतका भयानक होता की, लष्कराचा ट्रक 200-300 मीटर खोल खड्यात पडला आणि या ट्रकचे फक्त तुकडेच बाहेर काढण्यात आले. या अपघातातही 3 लष्करी जवान शहीद झाले. अपघाताच्या कारणाच्या चौकशीत असे दिसून आले की, लष्कराचा ट्रक घसरला होता. आणि तोल गेल्याने हा अपघात झाला.



Comments