धामणशेत येथील स्मशानभूमीला गळती, पत्रे ढासळले; प्रशासनाचे दूर्लक्ष
- Navnath Yewale
- Aug 15, 2025
- 1 min read

मोखाडा : "इतकेच मला जाताना सरणावर कळले होते" "मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते" सुरेश भटांनी या कवितेतून मरणही सुसह्य असल्याचे सांगितले असले तरी
मोखाडा तालुक्यातील धामणशेत कोशीमशेत ग्रामपंचायत मधील धामणशेत येथील स्मशानभूमीची पूर्णतः दुरावस्था झाली झाली असल्याने अंत्यविधी करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे
धामणशेत पाटीलपाडा ठाकूरवाडी अशी तीन गावपाड्यांची लोकसंख्या आठशे ते नऊशेच्या आसपास आहे या तिन्ही गावपाडयासाठी एक स्मशानभूमी आहे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी येथे जनसुविधा योजनेअंतर्गत धामणशेत गावालगत हि स्मशानभूमी बांधण्यात आली होती परंतु आजघडीला या स्मशानभूमीची पूर्णता दुरावस्था झाली आहे छपराचा काही भाग तुटलेला असून पोल गंजले आहेत तसेच संरक्षण भिंतीला तढे गेले असून समानशानभूमीचे शेड म्हणजे लोखंडी सापळा दिसतो आहे परिणामी पावसाळयात अंत्यविधी करताना तारेवरची कसरत नागरिकांना करावी लागत आहे
देशासह महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात ग्रामीण भागातील गावपाड्यांचा मोठा वाटा असला तरी खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारे गावपाडे आजही विकासापासून कोसो दूर आहेत मोखाडा तालुक्यातील अनेक गावपाडे आजही पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतिक्षा आहे. गेल्या अनेक अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासाठी मोठ मोठ्या आकड्यांची तरदूत केली जाते, पण येथील आदिवासींचा खऱ्या अर्थाने विकास मात्र होताना दिसत नाही.हेच यावरून अधोरिखीत होत आहे
धामणशेत येथील स्मशानभूमीचा प्रस्ताव मंजुरीला जिल्ह्याला पाठवला आहे परंतु हेतुपुरस्पर याकडे दुर्लक्ष केले जात आहे
वैशाली साळवे (उपसरपंच), धामणशेत कोशीमशेत ग्रामपंचायत



Comments