नसरापूर घटनेतील अरोपीचे विकृत सत्य उघड : प्राणी, वृद्ध महिला, स्वत:च्या मुलीलाही सोडले नाही
- Navnath Yewale
- 19 hours ago
- 2 min read

पुणे : पुणे येथे घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्णदेशाला धक्का बसला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चार वर्षाच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येची स्वत:हून दखल घेतली आहे. यानंतर त्यांनी कठोर कारवईची मागणी केली आहे. या घटनेमुळे देशातील मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नसरापूर घटनेतील नराधम आरेापीने कोर्टात संतापजनक दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचया आरोपाखाली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हिंसक आंदोलने झाली. पेशाने मजूर असलेल्या आरोपीने मुलीला जेवणाचे आमिष दाखवून गोठ्यात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याने दगडाने मारून तिची हत्या केली. आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी गावकर्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
आरोपी पहिल्यापासून विकृत असल्याची गावातील नागरिकांनी माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी नराधम आरोपीच्या घराला नोटीस लावली आहे. आरोपीने गावात कोंबड्यावर, शेळ्यांवर देखील अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 20 वषाृपूर्वी आरोपीला गावातून हाकलून देण्यात आले होते. या आरोपीने गावातील काही महिलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
तो गावात असताना महिला शेतात जाण्यास घाबरत होत्या. नसरापूर गावातील एका वयोवृद्ध महिलेवरही त्याने कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला आहे. तो कुत्र्यांवरही अत्याचार करायचा आणि कुत्र्यांना फाशी द्यायचा अशी माहिती गावकर्यांनी दिली आहे. आरोपीने त्याच्या मुलींवरही अत्याचार केला आहे. हे त्याच्या पत्नीला माहिती होतं. मात्र त्याच्या पत्नीने कुणालाही याबाबत सांगितलं नाही. आरोपीचा मुलगाही याच मानसिकतेचा आहे. त्याने एका वृद्ध व्यक्तीवर कोयत्याने वार केले होते.
आरोपीचा मुलागाही महिलांना पकडण्याचा प्रयत्न करायचा.पूर्ण गावाने त्याला वीस वर्षापूर्वी वाळीत टाकलं होतं. कोणीही त्यांच्या लग्नकार्यात जात नव्हतं. त्यांनाही बोलवत नव्हतं. गावकर्यांशी त्यांचा कुठलाही संबंध नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर नराधम आरोपीचा कोर्टात संतापजनक दावा केल्याची माहिती दिली आहे.
मला किरकोळ मारहाणीसाठी या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा आरोपीने न्यायालयात केला आहे. न्यायालयात कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने विचारेलेल्या प्रश्नावर आरोपीने संतापजनक उत्तर दिले. तुमची नेमकी काय केस आहे माहिती आहे का? असा न्यायालयाने आरोपीला सवाल केला होता. यावर सर ही मारामारीची किरकोळ केस आहे. त्यात मला गोवण्यात आलं आहे, असं नराधम आरोपीने उत्तर दिले आहे.



Comments