नारळी पौर्णिमेला उमरखाडीत धडकणार कलाकारांची फौज
- Navnath Yewale
- Aug 7, 2025
- 1 min read
परंपरा जपत आजही साजरा केला जात आहे 'चोर गोविंदाचा सण'

मुंबई : यंग उमरकडी क्रीडा मंडळ गोविंदा पथक आयोजित शिवसेना मुंबादेवी विधानसभापुरस्कृत महिला उपविभागप्रमुख प्रिय रुपेश पाटील यांच्यावतीने उमरखडीत उद्या ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:०० वाजता पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा महोत्सव म्हणजे 'चोर गोविंदाचा सण' साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी असंख्य गोविंदा पथके सराव शिबिरात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर मराठी मालिका व सिनेसृष्टीतील नामवंत मराठी कलाकार मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहेत.
बिग बॉस फेम दादुस, परमेश माळी , प्राप्ती रेडकर, सुशांत शेलार, रिल्स स्टार तन्मय पाटेकर, अशी मराठी मालिका व चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळी नारळी पौर्णिमा महोत्सवाला उमरखाडीत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. सुप्रसिद्ध कबड्डीपटू सुशांत देवाडिगा , विशाल माने हे देखील उपस्थित राहणार आहेत. लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना मुंबादेवी विभाग संघटक रुपेश पाटील यांनी दिली आहे. नागरिकांसाठी खास आगरी-कोळी गीतांचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. महिलांसाठी आकर्षक चषक व रोख रक्कम देण्यात येणार आहे.
पारंपारिक रूढी परंपरा जोपासत यावर्षी सुद्धा उमरखाडीत नारळी पौर्णिमेच्या दिवशी चोर गोविंदाचे आयोजन करण्यात आले आहे. दही हंडीच्या रशीला रंगीबेरंगी फुगे लावून त्या शेजारी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मुंबईतली मातब्बर गोविंदा पथके या शिबिरात हजेरी लावणार आहेत. चार थरापासून ते नऊ थरापर्यंत थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना आपला रुपेश फाउंडेशनचे अध्यक्ष व शिवसेना मुंबादेवी विभाग संघटक रुपेश पाटील व महिला उपविभाग प्रमुख प्रिया पाटील यांच्या हस्ते रोख रकमेसह आकर्षक ट्रॉफी व बक्षीसांचे वाटप करण्यात येणार आहे.



Comments