परळीतील महादवे मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात!एसआयटीने फास आवळला, दोघां संशयितांची ब्रेन मॅपिंग, सहा जणांची नार्को टेस्ट
- Navnath Yewale
- 5 hours ago
- 2 min read

बीड: जिल्ह्यातील परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकारणात दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येणार आहे. या प्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीनं याबाबत निर्णय घेतला आहे. महादेव मुंडे यांची हत्या होऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सध्या या प्रकरणात तपास अंतिम टप्प्यात पोहचला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीनं वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केंल असून मंगळवारी मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. याबाबत मयत महादवे मुंडे यांच्या पत्नी महादेव मुंडे यांनी खुलसा केला आहे.
महादवे मुंडे हत्या प्रकरणात एसआयटीने सात जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव पाठवला होता. एका संशयिताला लिव्हरचा त्रास असल्याने वैद्यकीय कारणास्तव त्याची तपासणी नाकरण्यात आली. आता 6 जणांच्या चाचणीला परवानगी मिळाली, ज्या पहिल्या तिघांची चाचणी पार पडली, ते सर्व जण महादेव मुंडे यांच्याशी आर्थिक व्यवहाराने जोडलेले होते, तर मृंगळवारी होणार्या चांचण्यांमधील दोघे जण वाल्मिक कराड याच्या घरी कामाला होते तिसरा त्यांचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान एसआयटीने सहा महिन्यापूर्वी 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा परळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत आत्तापर्यंत एकाही आरोपील अटक नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार, महादेव मुंडेची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरुन झाली आहे. आणि यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक आणि खळबळजनक दावे केले आहेत. हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडनं टेबलावर मुंडेंचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं, असा दाव बाळ बांगर यांनी केला आहे.
दिवंगत महादवे मुंडे हत्या प्रकरणात तत्कालीन पोलिस अधिकारी आणि एसआयटी तपासाबात ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणल्या की, “ माझे पती महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात मी मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी स्थापन करून घेतली होती. एसआयटीनं या प्रकरणात चांगलं काम केलं आहे. एसआयटीचा तपास हा आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग हा त्यांच्यापुढं शेवटचा पर्याय राहिला होता. यामध्ये अजनपर्यंत एकही आरोपी निष्पन्न झालेला नव्हात. आम्ही सांगितलं होतं की, हा तपास एका फोनवरुन थांबवला गेला आहे. त्या अनुषंगानं तुम्ही तपास करा एसआयटीनं देखील त्याच पद्धतीनं तपास केला आहे. यामध्ये आता वाल्मिक कराडच्या बंगल्यावरील नोकर म्हणून काम करणार्या व्यक्तीची ब्रेन मॅपिंग पॉझिटीव्ह आली आहे. त्यामध्ये गोट्या गित्ते हा फरार आहे. एसआयटीने स्थापन झाल्यापासून तो फरार आहे. ब्रेन मॅपिंग पॉझिटीव्ह आले आहेत. मात्र त्यांनी हा खून कसा घडवून आणला याचे खुलासे आले नाहीत, मात्र नार्को टेस्टमधून तो होईल” असं महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या
दरम्यान, महादवे मुंडे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं क्रूरपणे वार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूनं चार वार करण्यात आले. हातावर जखमा असल्यानं त्यांनी शेवटपर्यंत जीवाच्या आंकांतानं प्रतिकार केल्याचं स्पष्ट होतं. महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येच्या दुसर्या दिवशी शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांच्या मृतदेहावर रक्तानपं माखलेलं बनियान, शर्ट आणि चेहर्यावर गंभीर जखमा होत्या. अनेक महिने उलटूनही या प्रकरणातील आरोपी निष्पन्न न झाल्यामुळं महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामळे हे प्रकरण अधिक गंभीर झालं आहे.



Comments