पालघर अपघात प्रकरण: 12 मृतदेह रांगेत अंत्यदर्शनासाठी ठेवले, महिलांचा ह्रद्य पिळवटून टाकणारा टाहो
- Navnath Yewale
- 5 days ago
- 2 min read

मुंबई : अहमदाबाद महामार्गावर सोमवारी धानिवरी येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी लोकांना घेऊन जाणार्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या ट्रकला एका कंटेनरने धडक दिली होती. यामध्ये साखरपुड्याला जात असलेले 100 जण जखमी झाले होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बापूगाव येथील लाखातपाड्यावर अक्षरश: स्मशानशांतता पसरली होती. काल दुपारी चार वाजता सायरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मुलाचे सर्व नातेवाईक बापूगावातून निघाले होते. मात्र गावातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावच त्यांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या 13 जणांपैकी 12 जणांवर आज लाखनपाडा येथे एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अंत्यसंस्कारावेळी आपल्या आप्तेष्टांना निरोप द्यायला सर्व गावकरी लाखनपाडा येथे जमले होते. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले, आमदार हरिश्चंद्र भोये हे घटनास्थळी उपस्थित होते. यसावेळी 12 मृतदेह एका रांगेत ठेवण्यात आले होते. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. या अंत्यसंस्कारावेळी बापूगावातील वातावरण अत्यंत भावूक झाले होते. याठिकावणी स्त्रिया मोठमोठ्याने हंबरडा फोडत आक्रोश करत होत्या. अत्यसंस्करावेळचे हे दृश्य अक्षरश: डोळे पाणवराणे आणि ह्रदय पिळवटून टाकणारे होते. संपूर्ण गावातील लोक यावेळी मोठ्यास संख्येने उपस्थित होते. घरातील मंगलकार्यासाठी निघालेल्या 12 जणांचा अशाप्रकारे दुर्दैवी शेवट झाल्याने गावातील प्रत्येकाच्या मनाला चुटपूट लागून राहिली.
17 जखमींवर डहाणूच्या धुंदलवाडी येथील वेदांता रुृग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी आदिवासी विकास विभाग त्यांचं पालकत्व स्वीकारत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबबत तातडीने मदत जाहीर केल्याचं उईके यावेळी म्हणाले. तसेच जखमींच्या कुटुंबीयांना रुग्णालय ते गाव असं ये-जा करणार्यासाठी तसंच त्यांच्या राहण्याची पूर्ण व्यवस्था आदिवासी विकास विभाग करत असून आम्ही कोणालाही वार्यावर सोडणार नाही, असे आश्वासनदेखील योवळी उईके यांनी दिले.
काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जवळपास 100 जणांचे वर्हाड बापूगाव येथून खडकीपाडा येथे जायला निघाले होते. धानिवरी खडकीपाडा येथे जाण्यासाठी महामार्गावर हॉटेल तुळशी येथून यूटर्न घेऊन पुन्हा मागे यावे लागते. हा मोठा वळसा टाळण्यासाठी टेम्पो चालकाने धानिवारी पुलाखालून वळण घेतले. तेथून खडकीपाडा अर्ध्या किलोमिटरवर असल्याने टम्पो चालकने टम्पो राँग साईडने नेला. त्यावेळी समोरुन येणार्यसा कंटनेर दुभाजकावर चढून टेम्पोवर पडल्याने मोठा अपघात झाला.
आशर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच 100 हून िधिक वर्हाडी प्रवास करत होते. गाडीत असणारे सर्व वर्हाडी एकमेकांसोबत गप्पा मारत, थट्टा- मस्करी करत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात लग्णाच्या आणि साखरपुड्याच्या गप्पांमध्ये रंगले होते. सर्वांच्या चेहर्यावर मोठा आनंद होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. वर्हाडाच्या हा आयशर ट्रक नवरीच्या घराजवळ पोहोचलाच होता, तेव्हाच हा अपघात घडला आणि होत्याचं नव्हतं झालं.
मृतांची नावे : सुरेश रत्ना लाखात, पांडू गणपत लाखात,काळू गोविंद लाखात, सुनील अर्जून दांडेकर, चिमा गोविंद कुरहाड, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष सिताराम लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय अहाडी, रियांशी संतोष लाखात



Comments