top of page

पेट्रोलपंपावर आता ‘ नो पीयूसी नो फ्यूअल’ धोरण लागू, परिवहन मंत्र्याचे थेट आदेश

ree

राज्यातील वाहनचालकांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रदूषन मुक्त पर्यावरणााठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्या प्रमाणे वाहनचालकांवर काही निर्बंध घालण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने आता वाहनांना दिलं जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) हे वैध असणे गरजेचं असल्याचा नियम केला.तसेच भविष्यात प्रत्येक पेट्रोलपंपावर ‘ नो पीयूसी नो फ्युअल’ धोरण ही लागू केलं जाणार आहे. तर या धोरणाची अंमलबजावणी सक्तीने करावी असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यामुळे आता पंपावर पीयूसी असेल तरच पेट्रोल-डिझे ल मिळणार आहे.


परिवाहन आयुक्त कार्यालयात आज महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होहकर तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे प्रत्येक वाहनाचा क्रमांक स्कॅन करून त्याचे पीयूसी प्रमाणपत्र तपासले जाईल. प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. त्यामुळे आपल्याकडे असणारे वाहनाचे पीयूसी वैध असणे गरजेचे आहे.


या एका धोरणामुळे आता अवैध पीयूसी प्रमाणपत्रांना देखील आळा बसेल असा विश्वास सरनाईक यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. तर प्रत्येक पीयूसी प्रमाणपत्राला युनिक आयडेंटीटी ( यूआयडी) दिली जाईल, ज्यामुळे त्याची वैधता तपासणे सोपे होईल.


दरम्यान, आता या धोरणामुळे राज्यभर खळबळ उडाली असून “ नो पीयूसी .. नो फ्युअल” धोरण सक्तीचे करण्याचे निर्देश सरनाईक यांनी पेट्रोलपंप चालाकांना दिले आहेत. तर वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी त्याच पंपावर तात्काळ पीयूसी काढण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले

Comments


bottom of page