top of page

बसस्थानकवरील प्रवासी सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमु, सोपान मोरे, उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर आक्रमक


बीड: तालुका निर्मितीपासून उपाय योजनांच्या प्रतिक्षेत शिरुर कासारच्या बसस्थानकावरील प्रवासी सुविधांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सोपान मोरे, उजजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.


शिरुर कासार तालुका बसस्थानक गेल्या 25 वर्षापासून स्वच्छता, पाणी, विज यासह प्रवासी सुरक्षेच्या उपाय योजनांपासून दूर्लक्षीत आहे. बीड- अहिल्यानगर मार्गावर शिरुर कासारच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या शिरुरच्या बसस्थानकास संभाव्य काळातील विकासाचा दृष्टीकोण समोर ठेवून शहरातील दानशूर स्व. पोपटलाल बाफणा यांनी जमिन दान दिली. सुरूवातीला एसटी स्टँडची इमारत बांधण्यात आली.


मात्र, ट्रक्चर उभारताना प्रवाशांसाठी पाणी, स्वच्छता, विज, सुरक्षा आदी बाबींचा इमारतीमध्ये समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्याचे बसस्थानक असून देखील सुरुवातीचे दोन वर्षे येथे प्रवाशांअभावी स्मशान शांतता पसरलेली असायची. कालांतराणे शहरातील जून्या बाजारतळावरील बसस्थांबा बसस्थानकात पूनर्वसित झाल्यानंतर प्रवाशांची रेलचेल सुरू झाली. मात्र, येथे पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृह, विज या मुलभूत सुविधांअभावी प्रवाशांची कुचंबना, हेळसांड कायम सुरू आहे. याशिवाय सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, र्पूवेळ कर्मचारी नियुक्त नसल्याने सायंकाळच्या 5:00 वाजेनंतर बसस्थानकात स्मशान शांतता पसरते त्यातच विज पुरवठा नाही, पूर्ण परिसरत निवासी क्षेत असताना देखील बसस्थानकाचे अस्तित्व हारपलेले असते. सायंकाळी, रात्री लांब पल्याच्या बसमधील प्रवाशांना वाहक- चालक बसस्थनका ऐवजी चौकात उतरवतात.


प्रवासी सुरक्षेसाठी हे महत्वाचे आहे. पोलिस कर्मचार्‍यांचा राबता पहारा, सीसीटीव्ही कॅमर्‍यांच्या नजरेतील बसस्थानकातून प्रवाशी महिलांच्या पर्स, मौल्यावान सोने- चांदीच्या दागीने चोरीच्या घटना समोर येतात. शिरुरच्या बसस्थानकावर पूर्ण वेळ पोलिस कर्मचार्‍यांचीही नियुक्ती नाही, सीसीटिव्ही कॅमेरे ही नाहीत त्यामुळे महिला सुरक्षेसह प्रवाशांच्या लुटीचे प्रकारांना वाव मिळत आहे. अनेकवेळा छेडछाड, विनयभंग यासह चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी त्या मात्र रेकॉर्डवर नाहीत. पण याचा अर्थ जबाबदार यंत्रणेने हात झटकावेत असाही होत नाही.


प्रशासानाला मोठी दुर्घटना अपेक्षीत आहे का? असा प्रश्न प्रवासी नागरिकांतून होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान मोरे, उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर यांनी बसस्थानकातील परिस्थितीचा आढावा घेत निष्क्रीय जबाबदार प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. शिरुर बसस्थानकासाठी नव्याने इमारत मंजूर झाली आहे, या पार्श्वभूमीवर बसस्थानकाच्या सुरक्षा भिंतीचे काम प्रगती पथावर आहे. आधीच सखल भाग असल्याने बसस्थानकात पावसाळ्यात तळे साचते त्यामुळे एसटी बस बसस्थानकापर्यंत पोहोचत नाही.



नविन इमारातीचे स्ट्रक्चर उभारताना राजुरी (नवगन)- चिंचपूर मार्गाच्या संभाव्य उंची नुसार भरावा करण्यात यावा, प्रवाशांसाठी अद्यवत सुविधांचा समावेश करण्यात यावा यासह येत्या आठवभरात बसस्थानकात सुरळीत विज, स्वच्छ पाणी पुरवठ्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. आदी मागण्यांची दखल घेवून अमंलबजावणी करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.



पूर्णवेळ कर्मचारी नियुक्तीला मुहूर्त सापडेना?: राज्यमार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाला गेल्या 25 वर्षापासून शिरुर कासार तालुका बसस्थानकासाठी पूर्णवेळ कर्मचारी नियुक्तीसाठी महूर्त लागत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. बीडहून पुणे-मुंबईकडे मार्गस्थ होणार्‍या लांब पल्यांच्या एसटीबसच्या फेर्‍या वाढल्याने बसस्थानकात कायमस्वरुपी पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्तीही महत्वाची आहे.

Comments


bottom of page