मतदानापूर्वीच धुळ्यात बोगस मतदान कार्डाचा साठा सापडला रस्त्याच्या बाजूला हजारो बोगस मतदान कार्ड अढळले; राज्यभरात खळबळ
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 1 min read

धुळे: महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच धुळे येथे हजारो बोगस मतदान कार्डाचा साठा आढळला आहे. यामुळे उमेदवारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा साठा कोणाच्या मुळावर आणण्यासाठी आणला होता. याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस याप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक अयोगाच्या आचारसंहिता कक्षाच्या पथकाला प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
धुळे शहरातील देवपूर भागात हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडले आहेत. या घटनेची माहिती वार्यासारखी शहरात पसरली, त्यामुळे मतदानापूर्वीच वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटलं आहे. बोगस मतदान कार्डमुळे मोठी खळबळ उडाली असून हा सर्व प्रकार एआयएमआयएम पक्षाच्या पदाधिकार्याने उघडकीस आणला आहे. या बोगस मतदान कार्डमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निशाना एआयएमआयएम पक्षाने साधला आहे.
एआयएमआयएम च्या कार्यकर्त्यांनी हा साठा शोधून काढल्याने प्रशासनाच्या कारभारावर उमेदवारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इतक्या मोठ्या संख्येन मतदान कार्ड बाहेर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता, यावर वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना ही बोगस मतदान कार्ड सापडल्याने निवडणुकीत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व बोगस मतदान कार्डामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा संशय एआयएमआयएम पक्षाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. बोगस मतदान कार्ड मिळून आल्याने शहरातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे.
एआयएमआयएमचे इर्शाद जहागीरदार यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेत ही बोगस मतदान कार्ड त्यांच्याकडे सोपवून चौकशीची मागणी केली. ही बोगस कार्ड मतदादनाच्या दिवशी वाटण्यात येणार होती का? यामागे राजकीय कटकारस्थान आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रकरणाची दखल घेत निवडणुक आयागाच्या आचारसंहिता कक्षप्रमुखांना चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात कोणी दोषी आढळल्यास पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल असे निर्देशही त्यांनी दिले.



Comments