गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय: आता एकच कनेक्शन, पीनजी गॅसधारकांना एलपीजी गॅस सोडावा लागणार
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

देशातील वढत्या गॅस टंचाईवर सरकारने भूमिका मांडली असून घरगुती गॅसधारकांसाठी कुठलाही तुटवडा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मात्र केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकींगचा कालावधी वाढवला असून व्यवसायिक गॅस सिलेंडरचाव पुरवठाही बंद करणत आला आहे. त्यामुळे, सरकार गॅसटंचाई नाही असे सांगत असले तरीही गॅसटंचाई गावागावात जाणवत आहे. त्यातच, केंद्र सरकारने आणखी एक महत्पूर्ण निर्णय घेतला असून आता पीएनजी गॅस कनेक्शन असलेल्यांना एलपीजी गॅस कनेक्शन सोडावे लागणार आहे. त्यामुळे आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम नागरिकांच्या घरातील किचनवर झाल्याचं दिसून येत आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरगुती गॅस कनेक्शनसंदर्भात महत्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार ज्या लोकांकडे पाईपने गॅस पुरवठा होतो. त्या नागरिकांना आता एलपीजी गॅस कनेक्शन सोडावे लागणार आहे. त्यामुळे पीएनजी कनेक्शन वापरकर्त्या ग्राहकांना एलपीजी गॅस कनेक्शन तात्काळ सरकारकडे जमा करावे लागेल.
केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन आहे. ते सरकारी तेल कंपन्यांच्या डिस्ट्रीब्यूटर्सकडून एलपीजी सिलेेंडरसाठी पुरवठा प्राप्त करू शकणार नाहीत. घरगुती गॅसच्य उत्तम नियोजन आणि वाटपासाठी घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पीएनजी आणि एलपीजी गॅस कनेक्शन एकत्र ठेवल्याने गॅस पुरवठ्यामध्ये असमानता, काळाबाजार आणि संस्थाच्या अनावश्यक दुहेरी वापराची अडचण निर्माण होते. त्यामुळेच, ग्राहकांना एकाच गॅस कनेक्शनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्यांच्या घरी पहिल्यापासून पीएनजी गॅस कनेक्शन म्हणजेच पाईपद्वारे गॅस पुरवठा होत आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, पीएनजी गॅस कनेक्शनधारकांची संख्या मेट्रो शहर आणि महानगरांमध्ये मोठी आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणातील ग्राहकांना आपले एलपीजी गॅस कनेक्शन साडावे लागणार आहे.
भरारी पथकाकडून भिवंडीत 84 गॅस सिलेंडर जप्त:
इराण इस्त्रायल अमेरिका युद्धाच्या झळा जगभराला बसत आहेत. त्यामुळे सर्वत्र इंधन व गॅस टंचाई भासू लागली आहे. भारतात गॅस टंचाई प्रकर्षाने जाणवू लागलेली असल्याने शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे अनेक भागात व्यवसायिक गॅस सिलेंडरची काळाबाजारी सुरू आहे. यावर नियंतण मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाच्या नियंत्रणाखाली भरारी पथक नेमून कारवाईस सुरुवात केली आहे. अशाच एका कारवाईत भिवंडीत शिधावाटप नियंत्रण विभाग कार्यालयाच्या भरारी पथकाने कारवाई करत 84 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.



Comments