बारामती, राहुरी विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर दोन्ही जागां बिनविरोध निवडून येण्याची आशा धुसर!; ..तर आम्ही निवडणुक लढण्यास तयार - मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- 11 minutes ago
- 2 min read

मुंबई : निवडणूक आयोग रविवारी (दि.15) दुपारी चार वाजाता नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या बारामती, राहुरी या दोन रिक्त जागेंच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची व दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणुक आयोगाचे आयुक्त ज्ञाणेश कुमार यांनी जाहीर केला. 23 एप्रिलला मतदानर होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच बारामती विधानसभा मतदरासंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामतीत विधानसभा पोटनिवडणुक न लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचे नाव दिल्याने काही प्रमाणात धनगर समाज नाराज झाला आहे. त्यामुळे नाराज झालेल्यां पैकी कोणी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळं बारामतीची निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणुक लढणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष बारामती निवडणूक लढवणार नसला तरी धनगर समाजातील नाराजांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागिल विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढवली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमीका आहे.
राहुरीत महायुतीचा उमेदवार ठरला: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकी बाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल, पण जर आमच्यार जर निवडणुक लादली गेली तर आम्हीही निवडणुक लढायला तयार आहोत. राहुरी विधानसभा निवडणूकीसाठी शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांचे नांव महायुतीकडून अंतिम असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे हे इच्छुक आहेत. त्यामुळे येथे देखील निवडणूक होण्याची शक्यता आहे.



Comments