top of page

बीड प्रकरणात राज्याचं गृहमंत्रालय अपयशी; सुप्रिया सुळे लोकसभेत गरजल्या!


बीड; जिल्ह्यात दोन वर्षापासून कायद्याचा धाक राहिला नाही, कायदासुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या असो की परळी येथील व्यवसायिक महादवे मुंडे यांची निर्घुन हत्येचं प्रकरण असो. दोन्ही कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्रालयास अद्याप मनावं तसं यश मिळालं नसल्याचा आरोप करत, केंद्राच्या गृहमंत्रालयाने यामध्ये लक्ष घालून दोन्ही कुटुंबांना न्यायाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत केली.


मस्साजोग (बीड) चे सरपंचत सतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्ते नंतर जिल्ह्यात कायदासुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकरी अटक करण्यात आले आहेत. प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असली तरी अद्याप कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी फरार आहे. तब्बल आठ महिन्याचा कालावधी लोटला असला तरी फरार कृष्णा आंधळे अद्याप तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे कृष्णा आंधळे कुठे आहे? त्याचं काय झालं. यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड व संदीप क्षिरसागर यांनी सभागृहात कृष्णा आंधळेचं काही बरं वाईट झाल्याचा दावा केला असला तरी पोलिस यंत्रणेने कृष्णा आंधळे बाबत कुठलाच खुलासा केलेला नाही.


संतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर परळी येथील महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्तेचं प्रकरणही समोर आलं. हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख याच्या हत्ते प्रमाणेच महादेव मुंडे यांच्या हत्तेची माहिती सभागृहासमोर मांडली होती. दरम्यान, महादेव मुुंडे यांच्या मारेकर्‍यांना अटक करून न्यायामिळण्यासाठी ज्ञाणेश्वरी मुंडे ( महादेव मुंडे च्या पत्नी) शासन प्रशासन दरबारी खेट्या घालत आहेत. शिवाय महादेव मुंडे हत्ते प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबीयांना ÷उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला होता.


त्यातच एकेकाळचे वाल्मीक कराडचे सहकारी बाळ बांगर यांची या प्रकरणात एन्ट्री झाली आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणाच पटच समोर आणल्याचा दावा त्यांनी केला. बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांना केवळ जमिनिच्या व्यवहारापाई जीव गमवावा लागला असून, वाल्मीक कराड चा मुलगा श्री कराड , ज्ञाणेश्वर उर्फ गोट्या गित्ते व त्यांच्या सहार्‍यांनी महादेव मुंडे यांचा 22 महिन्यापूर्वी तहसील कार्यालयासमोर रात्री 9:00 च्या सुमारास निर्घुनपणे खून केला. महादेव मुंडे यांच्या मानेचा तुकडा गोट्या गिते याने वाल्मीक कराडच्या टेबलावर ठेवल्याचा धक्कादायक खुलासाही केला.


महादवे मुंडे यांच्या निर्घुन हत्तेचे फोटोच बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत मांडल्याने सर्वत्र संतापाटी लाट पसरली. न्यायासाठी ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी पालिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. तपास यंत्रणांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांची —भेट घेतल्या नंतर पोलिस अधिक्षक कार्यालया समोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.


त्यानंतर मराठा आंदोलक जरांगे यांनी ज्ञाणेश्वरी मुंडे यांची परळी येथे भेट घेन न्यायासाठी आम्ही सोबत असल्याचा विश्वास देत मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन करून ज्ञाणेश्वरी मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची —भेट घडवून देण्याची मागणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्ञाणेश्वरी मुंडे कुटुंबीयांची भेट घेवून न्याय मिळवण्याचे अश्वासन दिले होते. शिवाय खासदार सुळे सातत्याने ज्ञाणेश्वरी मुंडे यांच्या संपर्कात असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतात असे ज्ञाणेश्वरी मुंडे सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच ज्ञाणेश्वरी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली.


यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासे केले. मुंडे कुंटुंबीया व बाळा बांगर यांच्या खुलाश्यानुसार या प्रकरणातही वाल्मीक कराड व त्याची टोळी सहभागी असल्याचे नमुद केले. वाल्मीक कराड याची एक हजार कोटींच्या संपत्ती ताब्यात घेवून गरिब पिडीतांमध्ये वाटप करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. महादेव मुंडे हत्ते प्रकरणात एफआयआरमध्ये अ÷द्याप आरोपींची नावे आलेली नाहीत. तपासाठी एसआयटी गठीत करण्यात आली असली तरी अद्याप काही हालचाल नसल्याचा आरोप मुंडे कुटुंबीयांनी केला आहे.


बीड जिल्हा हा स्व.गोपिनाथ मुंडे यांचा जिल्हा आहे, येथील लोक मनमिळाऊ, सभ्य आणि चांगले आहेत. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडल्याचा दावा करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सभागृहात संतोष देशमुख व महादेव मुंडे हत्या प्रकरणात राज्याचे गृहमंत्रालय अपयशी ठरले असून कुटुंबीयांच्या न्यायासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने लक्ष घालण्याची मागणी केली.

Comments


bottom of page