बीडच्या ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने डोके ठेचून निर्घुन खून सातार्यातील भोसे गावातील घटना; आरोपी स्लीप बॉयच्या विरोधात गुन्हा
- Navnath Yewale
- 2d
- 2 min read

सातारा: कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून करून मृतदेह शेतात टाकण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमधील स्लीप बॉय म्हणून काम करणार्या युवकावर कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हेक मात्र अद्याप समोर आले नाही.
मच्छिंद्र अंबादास भोसले (वय 42) रा. उखळवाडी (ता. शिरुर कासार, जि. बीड) असे खुन झालेल्या ऊसतोड मजुराचे तर अजय राजेंद्र माने रा. भासे (ता.कोरेगाव , सातारा) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मच्छिंद्र भोसले हे गेल्या तीन ते चार वर्षापासून ऊस तोडणीसाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते. यंदाही ते पत्नी व कुटुंबासह चिमणगाव (ता. कोरेगाव) परिसरात वास्तव्यास आले होते.
15 जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जात असल्याचे सांगून स्लीप बॉय अजय माने याने त्यांना आपल्या शेतात नेले. तेथे पाय बांधून त्यांचा दगडाने डोके ठेचून निर्घुण खून केला. त्यानंतर मृतदेह ऊसाच्या शेतात टाकून दिला. दरम्यान,मच्छिंद्र भोसले घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील राजेंद्र माने शेतात गेले असता तेथे छिन्नविछिन्न अवस्थेत मच्छिंद्र भोसले याचा मृतदेह आढळून आला. सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत हुले यांनी आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. भोसले यांच्या पत्नीकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अजय माने याच्यासोबत पती गेले होते.
असे सांगितले. पोलिसांनी तातडीने माने याच्याकडे रुग्णालयात जाऊन चौकशी करून या प्रकरणाचा उलगडा केला. मात्र, आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याने पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत हुले हे पुढील तपास करत आहेत.
आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
खून केल्यानंतर आरोपी अजय माने याने भीतीपोटी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीनरे कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांना खुनाबाबत कोणतीही माहिती नव्हती.



Comments