बीडच्या एफडीएची शिरुर वारी, चर्चा मात्र लय न्यारी?
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 3 min read

संग्रहित
बीड: एफडीए विभागाच्या कर्मचार्यांनी गुरूवारी (दि.13) अचनाक शिरुर कासार शहरातील बाजारतळावरील किरकोळ व्यवसायीक, चहा विक्रेते, वडा पाव विक्रेते यांच्या अस्थापनातील स्वच्छतेची पाहणी केली. तब्बल एका महिनाभराच्या विश्रांतीनंतर एफडीएने पुन्हा शिरुर कासारच्या दिशेने पाऊल टाकले असले तरी, पहिले पाढे पंचावन्न या प्रमाणे याही वेळेस शहरातील किराणा, पान टपर्यांसह विविध खाद्यपदार्थांच्या अस्थापना शटरबंद झाल्याने हिरमोड झालेल्या अधिकर्यांना चक्क चहा विक्रेत्यांच्या अस्थापनांची तपासणी करावी लागली.
अलिकडेच एफडीच्या कारवाईने उभ्या महाराष्ट्राला हादरवणार्या भेसळयुक्त खवा कारखाण्यावरील छापेमारीने शिरुर कासार (दहिवंडी) राज्याच्या पटलावर आले. मानवी आरोग्यास हानीकारक दुधाशिवाय तयार होणार्या भेसळयुक्त खवा कारखाण्यावर छापा मारुन खवा, केक, बर्फी, यासह इतर खाद्य पदार्थांचे पुढील कारवाईसाठी नमुने घेण्यात आले होते. शिरुर पोलिस, ग्रामस्थ नागरिकांसमक्ष येथील शेकडो किलो भेसळयुक्त पदार्थ नष्ट करण्यात आले होते. कारवाईदरम्यान घेतलेल्या नमुन्यांचा प्रयोग शाळेचा अहवाल कसा? याचा संभ्रम कायम असतानाच गुरूवारी (दि.13) एफडीएच्या काही अधिकारी, कर्मचार्यांनी शिरुरच्या बाजारतळावरील चहा विक्रेते, वडापाव विक्रेत्यांच्या अस्थापनेतील स्वच्छतेची पाहणी केली.
एफडीचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धाडशी कारवायांनी भल्या-भल्यांच्या झोपा उडाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यसा सकल्पनेनुसार ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आयुक्त तुकाराम मुंडे यांना सरकारने ‘पॉवर’ दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात कॉस्मेटीक पासून खाद्य पदार्थ व त्यासाठी लागणार्या साहित्यांवर एफडीची करडी नजर आहे. त्याचाच भाग म्हणून मागील आठवड्यात बीड आणि माजलगाव खाद्य तेलांच्या कारखाण्यावरील एफडीएची कारवाई कौतुकास्पद ठरली.
आयएएस तुकाराम मुंढे यांच्या रुपाने निद्रिस्त असलेला राज्याचा एफडीए विभाग आता युद्धाच्या मैदानात उरावा तसा भेसळीच्या विरोधात सज्ज झाला हे एक अश्चर्य नाही म्हणता येणार पण इतिहासात नोंद करण्यायोग्य निश्चितच आहे. आयुक्त तुकाराम मुंडेच्या हुकूमानुसार जिल्हानिहाय एफडीए विभाग कामाला लागल्याने बाजारात किमान चांगल्या दर्जाचे खाद्य पदार्थ मिळू लागले. त्याचप्रमाणे ग्राहकवर्गही सावध होताना दिसून येत आहे. एफडीएच्या कर्तव्याचे फलित म्हणून बाजारात भेसळीच्या पदार्थांची काही प्रमाणात का होईना सुट्टी झाली.
मागिल महिन्यात शिरुर कासार शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दहिवंडी शिवारात दुधाशिवाय पामतेलसह इतर घातक पदार्थ व टेक्सटाईल मिलमध्ये कपड्यांच्या रंगासाठी वापरात येणारे ‘सफोलाइट’ या घात रसायणाचा वापर करून खव्यासह दुग्धजन्य खाद्यपदार्थ तयार करणार्या कारखाण्यावर शिरुर पोलिस आणि एफडीने संयुक्त छापा टाकला.या कारवाईत शेकडो किलो खवा, मिल्क केक, बर्फी, रवा, रिफाईंड पामतेल, मोतीचूर अनारोग्य पदार्थ नष्ट केले.
छापेमारीच्या पुढील कारवाईसाठी भेसळयुक्त पदार्थांचे प्रयोगशाळेस पाठवण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. प्रत्यक्षात कारखान्यातून बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जळगाव पर्यंत पदार्थ पाठवण्यात येत होते तसे दुकानाच्या नावाचे लेबलयुक्त खोके घटनास्थळावर उपलब्ध होते. शिवाय शिरुर शहरातील ज्या संशयित दुकानासाठी माल पाठवण्यात येत होता त्या दुकानातील खाद्य पदार्थांचे नमुने कारवईतील अधिकारी कर्मचार्यांनी ठरवून छापेमारीच्या दोन दिवस उशीराने घेतले.
प्रत्यक्षात बनावट खवा कारखाण्यावरील छापेमारीची एफडीएची कारवाईच संशयास्पद असल्याचे दहिवंडीचे सरपंच कालिदास आघाव यांच्यासह जानकार मंडळीनी बोलून दाखवली. छापेमारी दरम्यान घटनास्थळावर तीन संशयित व्यक्ती असताना केवळ एकच व्यक्ती अटक केली. पोलिसांच्या ताब्यातील व्यक्ती चौथ्या दिवसी नोटीसवर सोडून देण्यात आली. शिवाय अटक असताना सायंकाळी त्यास घरी सोडून देण्यात येत होते अशीही चर्चा आहे. या कारवाईच्या आडून मोठी डिल झाली? अशी दबक्या आवाजातील चर्चेला वाव मिळावा अशीच एफडीकडून मिठाईच्या दुकानांची झडती घेण्यात आली.
पुछती है ‘पब्लिक’: खाद्य पदार्थांच्या नमुन्यांचाइद फॉरेंन्सीक अहवाल किती दिवसात प्राप्त होतो? बनावट कारखान्यातील भेसळयुक्त खाद्य पदार्थांच्या नमुन्यासह मिठाईच्या दुकानातील नमुन्यांचा फॉरेन्सीक अहवालाचे काय झाले? अहवाल अनरोग्य आला आहे काय? जर अनरोग्य आला असेल तर आता छापेमारीतील एफडीएचे अधिकारी, कर्मचारी आरोपीवर कठोर कारवाईसाठी अहवालानुसार पुरवणी जबाब देणार काय? अहवाला अरोग्यासाठी सकारात्मक आला असेल, तर तात्पुरता बंद करण्यात आलेला खवा कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आदेश देणार का? कारवाईमुळे मिठाई दुकानाकडे पाठ फिरवलेल्या किमान ग्राहकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी एफडीए विभागाच्या कारवाईकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे.
महिनाभरापूर्वीच्या कारवाईबाबत संभ्रम असतानाच गुरूवारी (दि.13) एफडीएचे अधिकारी कर्मचारी शिरुर कासार शहरात डेरेदाखल झाले. अधिकार्यांची गाडी शिवारात प्रवेश करताच नेहमी प्रमाणे शहरातील किराणा, पानटपर्यांसह काही संबंधित अस्थापना शटरबंद झाल्या. त्यामुळे अधिकार्यांनी बाजारतळावरील छोटे व्यवसायिक, चहा विक्रेते, वडापाव विक्रेत्यांच्या अस्थापनांतील स्वच्छतेसह पाहणी केली. प्रत्यक्षात शिरुर शहरात परवानाधारक हॉटेल, मिठाई दुकाने, किराणा दुकानांकडे एफडीएच्या अधिकारी कर्मचार्यांनी मान वळून पाहण्याचीही तसदी घेतली नाही. त्यामुळे एफडीएच्या शिरुर वारी, ची चर्चा मात्र न्यारी असे चित्र दिसून येत आहे.



Comments